Ranveer singh Google
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

Ranveer Singh on Being Father: रणवीर सिंह हा एका इवेंटमध्ये पोहोचला होता .यावेळी आपण बाप बनल्यानंतरचा आनंद व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॅालिवूडचे पावर कपल म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत. बॅालिवूडमध्ये कमी काळातच दोघांनीही आपल्या अभिनयाची छाप सोडली. आणि बॅालिवूडच्या टॅाप एक्टर्समध्ये यांचा समावेश झाला.अभिनयाबरोबरच दोघांची लव स्टोरी तितकीत चर्चेत होती.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे लग्न बॅालिवूडमधले सर्वात महाग लग्नापैंकी एक होते. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिका पादुकोणने गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'दुआ पादुकोण सिंह' असे ठेवले आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर स्वतः दिली होती. त्यातच आता अभिनेता रणवीर सिंहने पहिल्यांदाच बाप बनल्यानंतरचा आनंद एका पब्लिक इवेंटमध्ये शेअर केला आहे.

बाप बनल्यानंतर तीन महिन्याने रणवीर सिंह एका पब्लिक इवेंट मध्ये आला होता. यावेळी त्याने बाप बनल्यानंतरचा आनंद जगासमोर व्यक्त केला आहे. तो म्हणाला, 'बाप बनल्यानंतर मी काही वेळेपासून 'डॅडी ड्युटीज' पूर्ण करत आहे.त्यामुळे मी खूप आनंदात आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. या जगात अशी कोणतीच भाषा नसेल,ज्या भाषेच्या शब्दांत मी माझा आनंद व्यक्त करु शकेल. दुःख वाटल्यानंतर ते कमी होत आणि सुख वाटल्यानंतर ते अजून वाढतं आणि दुप्पट होतं. हे सगळ एका जादू सारखे आहे.'

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांची लव स्टोरी कधी कोणापासून लपली नाही. ते ६ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी इटली या देशामध्ये लग्न केले. दिपिका पादुकोण आणि रणवीर सिंह या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले.

Edited by: Priyanka MUndinkeri

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT