Disha Patani Father
Disha PataniYandex

Disha Patani: अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची फसवणूक; घातला २५ लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?

Disha Patani father got cheated: बॅालिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची २५ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

बॅालिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही नेहमी आपल्या सिनेमा आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. यावेळी दिशा पाटनी ही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री दिशा पाटनी हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिशा पाटनीचे वडिल निवृत्त डिएसपी जगदिश सिंह पाटनी यांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. दिशा पाटनीचे वडिल जगदिश सिंह पाटनी यांना तब्बल २५ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पाच जणांच्या ग्रुपने मिळून त्यांना २५ लाखांचा चुना लावला आहे. सरकारी आयोगात उच्च पद, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद देण्याचे वचन देत त्यांची फसवूक करण्यात आली.आता याच्या विरोधात बरेली कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा पाटनीचे वडिल एक सेवानिवृत्त डिप्टी एसपी आहेत. ते बरेलीच्या सिव्हिल लाइन्स भागात राहतात. तक्रारारानुसार, आरोपी शिवेंद्र प्रताप सिंह यांना ते वैयक्तिकरित्या ओळखत होते. आरोपीने दिवाकर गर्ग आणि आचार्य जयप्रकाश या व्यक्तीं सोबत ओळख करुन दिली. नंतर त्यांनी जगदिश पाटनी त्यांचा विश्वात संपादन केल्यानंतर त्यांच्याकडून पाच लाख रोख रक्कम आणि २० लाख तीन वेगवेगळ्या बॅंक अकांऊट मध्ये ट्रान्फर करुन घेतले.

Disha Patani Father
Rupali ganguli : अनुपमाच्या सेटवर दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू, रुपाली गांगुलीला गंभीर दुखापत

आरोपी शिवेंद्र सिंहने राजकिय संबधाचा हवाला देत, सरकारी विभागात अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद देण्याचे आश्वासन दिले. विश्वास संपादन करण्यासाठी हिमांशु नावाच्या व्यक्तीला सरकारी अधिकारी बनवून भेट करवण्यात आली होती. पैसे देऊन तीन महिने झाल्यानंतरही काम झाल नसल्याने त्यांनी आरोपीला संपर्क साधला असता आरोपीने पैसे व्याजसह देण्याचे वचन केले. २५ लाख रुपये दिल्यानंतर, जगदिश पाटनीने काम न झाल्यामुळे आरोपींना पैसे परत मागितले, मात्र पैसे मागितले असता आरोपींना जगदिश यांना धमक्या देण्याचे सत्र सुरु केले. आणि त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या घटनेची तक्रार शुक्रवारी संध्याकाळी बरेली कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली.

Disha Patani Father
Hina Khan: कॅन्सरशी झुंजणारी अभिनेत्री हिना खानवर आणखी एक संकट; मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली अन्...

शिवेंद्र प्रताप सिंह, दिवाकर गर्ग, जुन्या आखाड्याचे आचार्य जयप्रकाश, प्रिती गर्ग आणि एका अज्ञात व्यक्तीं विरोधात , फसवणूक, जबरदस्ती पैसे उकळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

नुकताच दिशा पाटनीचा कंगुवा सिनेमा रिलीज झाला आहे. कंगुवा सिनेमात साऊथचे सुपरस्टार सूर्या आणि बॅालिवूड अभिनेता बॅाबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा १४ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे.

Edited by: Priyanka Mundinkeri

Disha Patani Father
Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com