Ranveer Singh Look in Dhurandhar 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: VFX किंवा AI नाही, 'धुरंधर २' मधील रणवीर सिंगचा 'तो' लूक असा केला होता तयार, पाहा व्हायरल VIDEO

Ranveer Singh Look in Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मधील रणवीर सिंहचा हॉरर लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . हा लूक VFX किंवा AI चा वापर न करता कसा तयार करण्यात आला हे पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.

Shruti Vilas Kadam

Ranveer Singh Look in Dhurandhar 2: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात त्याचा अभिनय आणि टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या चित्रपटात त्याचे मुख्य दोन लूक आहेत सुरुवातीला त्याला जसकीरत सिंग म्हणून दाखवले आहे आणि नंतर हमजा पण यासह त्याचा आणखी एक वेगळा लूक आहे जो थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला थक्क करत आहे. हा लूक म्हणजे त्याचा भूतिया लूक. या चित्रपटातील त्याचा भूतिया (ghost-like) लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा लूक बघून असे वाटते की VFX किंवा AI च्या परफेक्ट वापर करण्यात आला आहे. पण हा लूक पूर्णपणे प्रोस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने साकारण्यात आला आहे.

चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये रणवीर सिंहचा “अंधारातून जन्मलेला भूत” असा लूक दाखवण्यात आला आहे. हा लूक इतका उत्तम आहे की अनेक प्रेक्षकांना तो VFX असल्याचा भास झाला. मात्र, मेकअप आर्टिस्ट प्रीतीशील सिंग यांनी शेअर केलेल्या बिहाइंड-द-सीन्स (BTS) व्हिडिओमुळे या लूकमागील मेहनत समोर आली आहे.

या व्हिडिओमध्ये रणवीर सिंहवर तासन्तास चालणारा हेवी मेकअप आणि प्रोस्थेटिक प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी रणवीरला बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. रणवीरने 45 डिग्री तापमानातही हे मेकअप शूट पूर्ण केल्याचे समोर आले आहे. या लूकसाठी वापरण्यात आलेले SFX (Special Effects) मेकअप अत्यंत बारकाईने तयार करण्यात आले असून, त्यात केस, त्वचेची टेक्स्चरमुळे हा लूक अधिक भयानक आणि वास्तववादी दिसतो.

‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई करत असून, प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील रणवीर सिंहच्या अभिनयासोबतच त्याच्या या भयानक लूकचीही जोरदार चर्चा होत आहे. धुरंधर २ ने फक्त ४ दिवसात ४५० कोटींचा बिझनेस केला आहे. त्याच्यासह या चित्रपटात आर.माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांचेही भरभरुन कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT