ranveer singh news  Saam tv
मनोरंजन बातम्या

धार्मिक भावना दुखावल्याने अभिनेता गोत्यात; रणवीर सिंहच्या विरोधात पोलिसांत गुन्हा

ranveer singh news : धार्मिक भावना दुखावल्याने अभिनेता गोत्यात सापडला आहे. या प्रकरणी रणवीर सिंहच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Vishal Gangurde

रणवीर सिंह गोत्यात अडकला

रणवीर सिंहची ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' सिनेमावर टिप्पणी

रणवीर सिंहच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गोत्यात अडकला आहे. दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' सिनेमावर एका फिल्म फेस्टिवलमध्ये टिप्पणी करणे महागात पडलं आहे. ऋषभने सिनेमात चामुंडेश्वरी देवीची भूमिका निभावली होती. याच देवीच्या भूमिकेवर टिप्पणी केल्याने सोशल मीडियावर माफी मागितली होती. मात्र माफी मागितल्यानंतर रणवीरच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिवक्ता प्रशांत मेथलने रणवीर सिंहच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर बेंगळुरूच्या ग्राऊंड्स पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९, ३०२ आणि १९२ अंतर्गत अभिनेता रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिवक्ता प्रशांत यांनी म्हटलं की, 'मी भारताचा कायदे पाळणारा नागरिक आणि अधिवक्ता आहे. अभिनेता रणवीर सिंह याने केलेल्या वादग्रस्त कृत्याची तात्काळ दखल घेण्यात यावी, यासाठी मी तक्रार नोंदवत आहे. त्यांच्या कृत्यामुळे कोट्यवधी हिंदूं आणि कर्नाटकातील तुलू भाषिक समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत'.

तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, 'मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमधील आहे. या फेस्टिवलमध्ये रणवीर सिंहने 'कांतारा' सिनेमात दाखवल्या देवीची खिल्ली उडवली. त्याने कर्नाटकातील तुलू भाषिकांच्या मनात आदराचं स्थान असलेल्या देवीवर खिल्ली उडवणारी टिप्पणी केली. चांमुडेश्वरी असे या देवीचं नाव आहे. सार्वजनिक ठिकाणी ईश्वराची निंदा केली आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या, असा आरोप तक्रारकर्त्याने केला.

'खिल्ली उडवणाऱ्या अभिनेत्याचे लाखो चाहते आहेत. या अभिनेत्याने आंतरराष्ट्रीय मंचावरून देवतेची खिल्ली उडवली आहे. त्याने जाणूनबुजून खिल्ली उडवली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे, असेही अधिवक्ता प्रशांत यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : फरशीवरील चिकट डाग कसे काढावे? वापरा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Pune Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; १० दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश

Five Rajyog On 2026: 500 वर्षांनी या राशींचं नशीब फळफळणार; 5 राजयोग करणार सर्व इच्छा पूर्ण

EPFO Update: EPFO चा मोठा निर्णय! या PF खातेधारकांना KYC अनिवार्य; अन्यथा अकाउंट होणार बंद

SCROLL FOR NEXT