भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक; महिलांसमोर अश्लील शिवीगाळ, दारातील वाहने फोडली

Yavatmal latest news : यवतमाळमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक झाली. ५ ते ६ अज्ञातांनी महिलांसमोर अश्लील शिवीगाळ करण्यात आली.
yavatmal
yavatmal newsSaam tv
Published On
Summary

मतदानानंतर रात्री १२ च्या सुमारास भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक

तोंड झाकून आलेल्या ५-६ अज्ञात आरोपींनी वाहनांचंही केलं मोठं नुकसान

महिलांसमोर अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : यवतमाळमध्ये नगरपालिका निवडणुकांचं मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्षांच्या घरावर रात्री १२ वाजताच्या दरम्यान दगडफेक झाली. यवतमाळच्या पांढरकवडा येथील घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

श्रीराम मेल्केवार असे भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्षांचं नाव आहे. त्यांच्या घरावर रात्री बारा वाजताच्या सुमारास ५ ते ६ अज्ञात लोक आले. या लोकांनी मेल्केवार यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या.

yavatmal
Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

या अज्ञातांनी घरातील महिलांसमोर अश्लील शिवीगाळ केली. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यवतमाळच्या पांढरकवडा भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरातील हजारो नागरिकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यावर धडक दिली.

yavatmal
Mumbai Local : 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या; पहिली आणि शेवटची लोकल कधी सुटणार?

घरावर दगडफेक करणाऱ्या अज्ञात आरोपींनी चेहऱ्यावर कापड बांधून तुफान केली होती. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्ता आणि गैरकायद्याची मंडळ जमविणाऱ्यासह विविध कलमान्वये पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ज्योती श्रीराम मेल्केवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

yavatmal
Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

सावंतवाडी राडा प्रकरणी गुन्हा नोंद

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत मतदानाच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सावंतवाडीतील मतदान संपताच झालेल्या राडाप्रकरणी भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या 20-25 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात रात्री झालेल्या गोंधळात 40-50 कार्यकर्त्यांवरही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाजपच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष उमेदवार नीता कविटकर यांच्यासह 20-25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर शिवसेनेच्या फिर्यादीनुसार भाजपचे विनोद राऊळ, अॅड. अनिल निरवडेकर यांच्यासह 20-25 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com