Mumbai Local : 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या; पहिली आणि शेवटची लोकल कधी सुटणार?

Mumbai Local news : 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. जाणून घ्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक
Mahaparinirvan Diwas trains
mahaparinirvan dinSaam tv
Published On
Summary

महापरिनिर्वाण दिनी मध्य रेल्वेने रात्रीच्या विशेष गाड्या वाढवल्या

परळ–कल्याण आणि कुर्ला–वाशी/पनवेल मार्गावर १२ अतिरिक्त लोकल धावणार आहे

महापरिनिर्वाण दिनी विशेष गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबणार आहेत

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईत मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे ६ डिसेंबर रोजी प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्यरात्री लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान १२ अतिरिक्त उपनगरी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. या लोकल ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील

कसं असेल वेळापत्रक?

मुख्य मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे/कुर्ला– परळ मार्ग)

कुर्ला –परळ ही विशेष गाडी कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल. कल्याण– परळ ही विशेष गाडी कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे ०२.२० वाजता पोहोचेल. ठाणे–परळ ही विशेष गाडी ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे ०२.५५ वाजता पोहोचेल.

Mahaparinirvan Diwas trains
भाजप आणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी, राणे बंधूंमध्ये वाद पेटला; नेमकं काय घडलं?

मुख्य मार्ग – डाउन विशेष गाड्या (परळ - कुर्ला/ठाणे/कल्याण मार्ग)

परळ– ठाणे/कल्याण ही विशेष गाडी परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०१.५५ वाजता पोहोचेल. परळ – कल्याण ही विशेष गाडी परळ येथून ०२.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.५० वाजता पोहोचेल.परळ– कुर्ला ही विशेष गाडी परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.२० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्ग – अप विशेष गाड्या (पनवेल/वाशी – कुर्ला मार्ग)

वाशी – कुर्ला ही विशेष गाडी वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल. पनवेल – कुर्ला ही विशेष गाडी पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल. वाशी–कुर्ला ही विशेष गाडी वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.

Mahaparinirvan Diwas trains
Mumbai : कपडे काढण्यास सांगितले अन्...; बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार, कंपनीच्या MDसह 5 जणांवर गुन्हा

हार्बर मार्ग – डाउन विशेष गाड्या (कुर्ला– वाशी/पनवेल मार्ग) कुर्ला – वाशी ही विशेष गाडी कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल. कुर्ला – पनवेल ही विशेष गाडी कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल. कुर्ला –वाशी ही विशेष गाडी कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.

Mahaparinirvan Diwas trains
Solapur Accident : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; सोलापुरात भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा.तसेच प्रवाशांना गैरसोयी टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com