Ramesh Deo SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ramesh Deo : मुंबईतील 'या' मार्गाला मिळाले रमेश देव यांचे नाव, आनंद व्यक्त करत अजिंक्य देव म्हणाला...

Ramesh Deo 96th Birth Anniversary: कला प्रेमींसाठी आनंदाची बातमी! दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले.

Shreya Maskar

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव (Ramesh Deo) यांच्या 96 व्या जयंती दिनानिमित्ताने अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे 'अभिनेते श्री. रमेश देव मार्ग' असे नामकरण करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी 'मराठी चित्रपट कट्टा' चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांची महती खूप आहे. यांनी खूप सुपरहिट चित्रपट केले आहेत. अशा महान कलाकाराच्या नावाचा मार्ग होणे हे समस्त महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना आनंद देणारी बाब आहे. अशी भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की, "'मराठी चित्रपट कट्टा'च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड या प्रत्येकाने केलेलं काम महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी झाले त्याचा आम्हाला अभिमान आहे."

चांगल्या प्रसंगी अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) म्हणाले, "आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज बाबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला याचा खूप आनंद झाला आहे. यासाठी मी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजप नेते विनोद तावडे, आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या प्रस्तावावर त्यांनी विचार करून पुढाकार घेत यासाठी परवानगी दिली. हे बाबांचे आशीर्वाद आहेत. याचा त्यांना ही निश्चितच आनंद झाला असेल. "

शुभ प्रसंगी अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. यात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थिती लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Vakri 2026: 30 वर्षांनंतर शनी चालणार वक्री चाल; या राशींना मिळणार लाभाची संधी

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Virat Kohli: इंस्टावर कोहलीचं कमबॅक! का डिएक्टिव झालेलं विराटचं अकाऊंट? जाणून घ्या

Akola Mayor: अकोल्यात कमळ फुलले! बहुमताचा आकडा नसतानाही भाजपने राखला गड; ठाकरेंचा पराभव

SCROLL FOR NEXT