सध्या 'स्काय फोर्स' (Sky Force) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पाहायला मिळत आहे. तसचे 'स्काय फोर्स' मधून वीर पहारिया (Veer Pahariya) याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. वीर पहारिया हा अक्षय कुमारसोबतच मुख्य भूमिकेत आहे. वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. या चित्रपटात वीर पहारिया, अक्षय कुमारसोबतच निमृत कौर आणि सारा अली खान देखील पाहायला मिळत आहेत.
'स्काय फोर्स' चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. तसेच त्यांनी चित्रपटाचे खूप तगडे प्रमोशन देखील केले आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे वीर पहारिया चांगलाच चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत वीर पहारियाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. त्याने आपल्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
मुलाखतीत वीरने आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्याला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागले याचा खुलासा त्याने केला आहे. वीरने सांगितले की, "आई वडिलांच्या घटस्फोटानंतर शाळेत जायला मला लाज वाटायची. माझे बालपण खूप कठीण काळात गेले आहे. लहानपणी आपल्या पालकांचे तुटलेले नाते पाहणे कोणत्याही मुलासाठी योग्य नाही. वृत्तपत्रे न्यायालयीन कार्यवाहीबद्दल सतत तपशील देत राहायचे. मी लहान असल्यामुळे मित्रांसोबत कसे शेअर करायचे हे मला माहित नव्हते."
वीर पुढे म्हणाला, "माझ्या शाळेतील मुलं मला खूप हसायची त्यामुळे मी त्यांना काही शेअर करू शकत नव्हतो. हे सर्व माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. यामुळे मला शाळेत जायची खूप लाज वाटायची आणि माझे फारसे मित्र नव्हते. बराच काळ लोक माझ्यापासून दूर राहिले. यावेळी अभिनयाने मला थेरपीप्रमाणे यावर मात करायला मदत केली.
वीर पहारिया हा राजकीय कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या वडीलांचे नाव संजय पहारिया आहे. तर आईचे नाव स्मृती शिंदे असे आहे. वीर पहारियाची आई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मुलगी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.