मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. सीमा देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे.
सीमा देव यांचे निधन अल्झायमर या आजारामुळे झाला आहे. ते या आजारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होते. २०२२ मध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि सीमा देव यांचे पती रमेश देव यांचे निधन झाले होते.
रमेश देव यांनी १९६२ मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) यांच्यासोबत विवाह केला. रमेश देव आणि पत्नी सीमा देव यांच्यामध्ये जवळपास १४ वर्षांचं अंतर होतं. चला तर जाणून घेऊया रमेश देव आणि सीमा यांच्या प्रेमकहाणीबद्दल.
रमेश देव सीमा देव यांची लव्हस्टोरी जितकी रिअल लाइफमध्ये चर्चेत होती. तितकीच ऑन स्क्रिन देखील त्यांची लव्ह स्टोरी चर्चेत होती. मराठी सिनेसृष्टीत या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती तर काही हिंदी चित्रपटात दोघांनीही दुय्यम भूमिका साकारली होती. पण तरी सुद्धा रमेश देव आणि सीमा देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांमध्ये जास्त काम केलं.
रमेश देव यांनी १९५० मध्ये मराठी चित्रपटातून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली होती. रमेश देव यांनी मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका तर, हिंदी चित्रपटात सह कलाकाराच्या भूमिकेत काम केले. सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण होत असताना, रमेश देव यांनी नलिनी सराफ (सीमा देव) यांच्यासोबत आपली ओळख निर्माण केली. (Marathi Film)
चित्रपटसृष्टीत नलिनी सराफ यांनी सीमा या नावाने सुरुवात केली होती. १९६० मध्ये ‘जगाच्या पाठीवर’ या मराठी चित्रपटामध्ये सर्वात आधी एकत्र काम केले होते. त्यांचा तो चित्रपट बराच सुपरहिट ठरला होता. आणि त्यांची जोडी देखील नावारूपाला आली. (Entertainment News)
‘जगाच्या पाठीवर’ नंतर रमेश आणि सीमा १९६२ मध्ये ‘वरदक्षिणा’च्या माध्यमातून पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्या माध्यमातूनच त्यांच्या सदाबहार लव्हस्टोरीची सुरूवात झाली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी लग्नगाठ देखील बांधली होती. २०१३ मध्ये रमेश आणि सीमा यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली होती. ५० वर्षानंतरही त्यांच्या नात्यातील गोडवा एखाद्याला हेवा वाटावा असाच कायम होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.