Seema Deo Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Seema Deo Passed Away: वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मावळली आहे.
Seema Deo Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

अभिनेत्री सीमा देव यांचे निधन:

मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने सिनेविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

Seema Deo Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा
Ramesh Deo And Seema Deo Love Story: दोन दशकं एकत्र काम, नकळत प्रेम खुललं; सेटवर अशी फुलली होती रमेश आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

सीमा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला दिले आहेत. एकूण ८० चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिलाय. सीमा यांचे पती रमेश देव यांनी देखील मनोरंजन विश्वात उल्लेखनीय कामगीरी केली आहे.

साल १९६० मध्ये प्रदर्शित झालेला मिया बीबी राजी हा सीमा यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी जगाच्या पाठीवर या चित्रपटात काम केलं. मराठीमधील या चित्रपटाने त्यांना घराघरात पोहचवलं. आज सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सीमा देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com