Ramayana Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ramayana Collection : रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट ४०० कोटींच्या उंबरठ्यावर; तिसऱ्या दिवशीही छप्परफाड कमाई, वाचा कलेक्शन

'Ramayana: Rise of a Legend' Box Office Collection Day 3 : रणबीर कपूरचा 'रामायण पार्ट १' चित्रपट वीकेंडला खूप गाजला आहे. 'रामायण' रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने तीन दिवसांत छप्परफाड कमाई केली.

Shreya Maskar

बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरचा बोलबाला

'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज

'रामायण' लवकरच गाठणार ४०० कोटींचा टप्पा

रणबीर कपूरच्या 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) चित्रपटाची सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यशच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. 'रामायण'चा पहिला भाग दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. 'रामायण' पार्ट १ चे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्मिते नमित मल्होत्रा आहेत. 'रामायण' ४००० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे.

'रामायण' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३

'रामायण' चित्रपटाचे रिलीजनंतर तीन दिवसांत जागतिक स्तरावर एकूण ग्रॉस कलेक्शन ३७५.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने भारतात एकूण १८२.७० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे, तर देशांतर्गत एकूण ग्रॉस कलेक्शन २१८.२५ कोटी रुपये इतके झाले आहे. शनिवारी ६९.८० कोटी रुपयांची भर पडल्यामुळे, परदेशातील एकूण कमाई १५७.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात १५० कोटी रुपयांच्या नेट कमाईचा टप्पाही ओलांडला. यामध्ये हिंदी भाषेतील आवृत्तीचे योगदान सर्वाधिक राहिले आहे.

शनिवारी हिंदी आवृत्तीने १९,९२७ शोजमधून ५३ कोटी रुपयांची कमाई केली. कन्नड आवृत्तीने ९०७ शोजमधून ६.३० कोटी रुपये, तर तेलुगू आवृत्तीने १,५८६ शोजमधून ६ कोटी रुपयांची कमाई केली. तमिळ आवृत्तीने ६८३ शोजमधून २.५० कोटी रुपये आणि मल्याळम आवृत्तीने ५९३ शोजमधून २ कोटी रुपयांची कमाई केली.

'रामायण' स्टार कास्ट

'रामायण' मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत झळकले आहेत. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, कुणाल कपूर आणि काजल अग्रवाल यांसारख्या अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुलाबी थंडीची चाहूल अन् भक्तिसंगीताची बरसात; पुण्यात रंगली दिवाळी पहाट

Railway Rule : रेल्वेने दिवाळीला गावी जाताय? मग चुकूनही बॅगेत फटाके ठेवू नका; अन्यथा होऊ शकते शिक्षा

BREAKING: पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; लाल्याला ३-४ जणांनी अडवलं अन् थेट..

Maharashtra Weather: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; ऐन दिवाळीत पहाटेचा गारवा वाढला, पण दिवसा तापमानात वाढ, IMD चा अंदाज

Sunday Horoscope : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या ४ राशींचं भाग्य उजळणार! माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार धनलाभ

SCROLL FOR NEXT