Ram charan RIP letter Google
मनोरंजन बातम्या

Ram Charan : राम चरणला दिली 'गेम चेंजर'च्या ट्रेलरसाठी धमकी, चाहत्यानेच लिहिले 'RIP लेटर'

Ram Charan : एखाद्या चाहत्याने चित्रपटाबाबत 'RIP लेटर' लिहिल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? राम चरणच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित न झाल्यामुळे चाहत्यांने RIP लेटर लिहिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Charan : साऊथ स्टार्स त्यांच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. आपल्या आवडत्या कलाकारांचे मंदिर बनवणे असो, रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटगृहात चित्रपट पाहणे असो किंवा तुमच्या आवडत्या स्टारच्या घरी जाणे असो. अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. पण नुकतीच एक घटना समोर आली आहे जी सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरत आहे. एखाद्या चाहत्याने चित्रपटाबद्दल 'RIP लेटर' लिहिल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? साऊथचा सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या आगामी 'गेम चेंजर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी एका चाहत्याने त्याला धमकी पत्र लिहिले आहे.

राम चरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यास उशीर झाल्यामुळे त्याच्या एका चाहत्याचे लिहिलेले RIP लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चाहत्याने 'गेम चेंजर'च्या ट्रेलरबाबत कोणतेही अपडेट नसल्यामुळे त्याला हे पाऊल उचलावे लागले असल्याचे सांगितले आहे. हे पत्र त्याने तेलुगू भाषेत लिहिले आहे.

चाहता निराश का झाला?

या चाहत्याने स्वतःचे नाव ईश्वर असे लिहिले आहे. त्याने निराशा व्यक्त करत चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केवळ 13 दिवस शिल्लक असूनही, निर्मात्यांनी कोणताही ट्रेलर का केला नसल्याचा जाब विचारला आहे.'गेम चेंजर' हा राम चरणचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. मात्र, अद्याप या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आलेला नाही.

पत्रात काय लिहिले होते?

ईश्वरने या पत्राचे शीर्षक 'RIP लेटर' लिहून पुढे लिहिले की, 'तुम्ही चाहत्यांच्या भावनांचाही विचार करत नाही. या महिन्याच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने गेम चेंजर चित्रपटात ट्रेलर शेअर केला नाही तर, मला तुम्हाला कळविण्यास खेद वाटतो की, मला माझ्या जीवनांचा अंत करण्यासारखे कठोर पावले उचलण्यास भाग पाडले जाईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT