
Mufasa: The Lion King : 2024 साली प्रेक्षकांमध्ये चित्रपटांची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. यावर्षी अनेक उत्कृष्ट चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत, ज्यात 'स्त्री 2', 'पुष्पा 2', 'फाइटर', 'कल्की 2898 एडी' आणि इतर अनेक नावांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करत चांगली कमाई केली आहे. मात्र, 'पुष्पा 2'ने कमाईत सर्व चित्रपटांना मागे टाकत अनेक विक्रम रचले, पण आता 'पुष्पा 2'चाही विक्रम शाहरुख खानच्या 'मुफासा: द लायन किंग'ने मोडला आहे.
या डिसेंबरमध्ये वॉल्ड डिस्नेचा ॲनिमेटेड चित्रपट 'मुफासा: द लायन किंग', विजय सेतुपतीचा चित्रपट 'विदुथलाई 2', कन्नड साय-फय चित्रपट UI, मल्याळम चित्रपट 'मार्को' आणि नाना पाटेकरचा चित्रपट 'वनवास' प्रदर्शित झाले. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट 20 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाले असून, त्यापैकी 'मुफासा' कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. मात्र, भारतात या चित्रपटाने आठव्या दिवसापर्यंत 100 कोटींचा टप्पाही ओलांडला नसला तरी जगभरातील या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत 1700 कोटींचा टप्पा पार केला आहे.
7 दिवसात 1700 कोटींची कमाई केली
भारतातील 'मुफासा' बद्दलची क्रेझ मुख्यतः शाहरुख खान आणि महेश बाबू यांच्यामुळे होती, कारण या दोघांनीही या चित्रपटाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांसाठी आवाज दिला आहे. चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने 6.6 कोटी रुपये कमावले आहेत, जे 'पुष्पा 2' च्या 23 व्या दिवसाच्या कमाईपेक्षा कमी आहे, कारण पुष्पा २ ने २३ व्या दिवशी 8.75 कोटी आहेरुपयांची कमाई केली. चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने 22 दिवसांत 1700 कोटींची कमाई केली, तर 'मुफासा'ने अवघ्या 7 दिवसांत हा आकडा पार केला.
'वनवास' आणि UI ची लाखोंमध्ये कमाई
मात्र, 'मुफासा' सोबत रिलीज झालेल्या इतर चित्रपटांच्या कमाईवर नजर टाकली तर 'वनवास'ची सुरुवात सर्वात कमी आहे. आठव्या दिवशी 'वनवास'ची कमाई 9 लाख रुपये झाली असून,चित्रपटाची एकूण कमाई 4.25 कोटी रुपये झाली आहे. 'मार्को' या मल्याळम चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, चित्रपटाबाबत लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाने आठव्या दिवशी 2.35 कोटींची कमाई केली आहे, जी 'मुफासा' वगळता इतर चित्रपटांच्या कमाईपेक्षा चांगली आहे. तामिळ भाषेतील 'विदुथलाई 2' या चित्रपटाने आठव्या दिवशी एक कोटी रुपयांची कमाई केली आहे. UI बद्दल बोलायचे झाले तर या कन्नड चित्रपटाने 87 लाखांची कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.