Raha Kapoor : 'प्रिंसेस ऑफ कपूरस्'; राहाच्या 'त्या' व्हिडीओवर चाहते फिदा, कमेंट्सचा होतोय पाऊस

Raha Kapoor : बॉलीवूड स्टार्ससोबतच चाहते त्यांच्या मुलांनाही पसंत करतात. यापैकी सर्वाधिक चर्चेत आहेत ती म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर.
Alia bhatt ranbir kapoor and raha kapoor
Alia bhatt ranbir kapoor and raha kapoorGoogle
Published On

Raha Kapoor : नवीन वर्ष जसजसे जवळ येत आहे तसतसे लोकांच्या नजरा बॉलीवूड स्टार्सच्या पार्ट्यांकडे लागल्या आहेत. मात्र, दरम्यान, असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीवर गेले आहेत, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नावाचा समावेश आहे. पण दोघांनाही एक मुलगी असल्याने ती दोन्ही स्टार्समधली सगळी लाइमलाइट तिच्या नावावर घेते. काही काळापूर्वी राहाने पापाराझींना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यामुळे आता ती पुन्हा एका अतिशय गोंडस शैलीत दिसली आहे.

अलीकडेच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि राहा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परदेशी जाताना विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी नीतू कपूर, सोनी राजदान आणि शाहीन भट्टही दिसले. सर्वांमध्ये राहा हिने खूप गोंडस पद्धतीने पापाराझींना हॅलो म्हणत लोका लक्ष वेधून घेतले. पापाराझींनी रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

Alia bhatt ranbir kapoor and raha kapoor
YJHD Re Release : 'नैना-बनी'कडून चाहत्यांना न्यू इयर गिफ्ट, रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी है दीवानी' पुन्हा चित्रपटगृहात

पापाराझीला फ्लाइंग किस

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आलिया राहासोबत एअरपोर्टवर प्रवेश करत होती, त्याचवेळी पापाराझीने राहाचे नाव मागून घेतले, त्यावर राहा तिच्याकडे वळली आणि प्रेम म्हणाली हॅलो म्हणाली. राहाच्या या कृतीने लोकांची मने जिंकली, पण इतकंच नाही तर यानंतर राहाने पापाराझींना फ्लाइंग किसही दिला, राहाच्या या क्यूट कृतीवर आलिया आणि रणबीरही हसू आवरले नाहीत.

Alia bhatt ranbir kapoor and raha kapoor
Suraj Chavan : लवकरच पूर्ण होणार 'बिग बॉस'चा बंगला; मजुरांसोबत स्वतः राबतोय सूरज, पाहा VIDEO

ती आधीच सुपरस्टार बनली आहे

इन्स्टंट बॉलीवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यावर चाहत्यांनी खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी राहाच्या क्यूटनेसचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिची तुलना आलिया भट्टच्या सौंदर्याशी केली आहे. एका यूजरने ती आधीच सुपरस्टार बनल्याचे लिहिले आहे. त्याचप्रमाणे ख्रिसमसच्या दिवशीही राहाने सगळ्यांना प्रेमाने शुभेच्या दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com