Rakhi Sawant Vs Sherlyn Chopra Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: राखीची अटकपूर्व जामिनासाठी धाव! शर्लिन प्रकरणी राखीला बेल मिळणार की जेलवारी अटळ?

राखीने आज मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या बरीच चर्चेत आहे. एकीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही गडबड सुरु आहे, तर दुसरीकडे शर्लिन चोप्रा प्रकरणात तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पण राखीला हे पुन्हा होऊ द्यायचे नाही. या कारणास्तव राखीने आज मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे.

यापूर्वी शर्लिन चोप्राच्या केस प्रकरणी कारवाई करत आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ताब्यात घेतले होते. मात्र, तासंतास चौकशी केल्यानंतर सायंकाळी पोलिसांनी राखीला सोडून दिले होते. शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर गेल्या काही दिवसांपुर्वी अंबोली पोलिसांनी कडक कारवाई करत राखी सावंतला ताब्यात घेतले.

मात्र, आता राखी सावंतने अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज राखीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या ट्वीटप्रमाणे, ड्रामा क्वीन राखी सावंतने अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

राखी सावंतवर शर्लिन चोप्राचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल केल्याचा आरोप आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शर्लिन चोप्रासोबत सुरू असलेल्या वादामुळे राखी सावंतला १९ तारखेला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शर्लिन चोप्राने गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर 2022 रोजी राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती.

ड्रामा क्वीनने तिच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली असल्याचा आरोप अभिनेत्रीने राखीवर केला होता. इतकंच नाही तर शर्लिनच्या म्हणण्यानुसार, राखीने विनाकारण तिच्या, राज कुंद्रा आणि साजिद खान यांच्यात सुरू असलेल्या भांडणात उडी घेतली, त्यानंतर राखीने शर्लिन चोप्राचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी राखी सावंतला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: देवगिरी बंगल्यावर नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा

Budh Ast: 5 दिवसांनी बुध ग्रह होणार अस्त; किरकोळ चुकीमुळे 'या' राशींचं होणार मोठं नुकसान, अडचणीही येणार

Nandurbar Election results : काँग्रेसचा गड कोसळला, नंदुरबारमध्ये ३ जागांवर महायुतीचा दणदणीत विजय

Daily Horoscope: आज 'या' राशी होणार मालामाल; वाचा आजचे राशीभविष्य

दया दरवाजा तोड दो! CID चा मुहूर्त ठरला; चोर पोलिसांचा खेळ पुन्हा सुरू,कधी अन् कुठे पाहा

SCROLL FOR NEXT