KL Rahul Athiya Shetty Wedding: शुभमंगल सावधान! अखेर आथियाने घेतली KL राहुलची विकेट; विवाहसोहळा संपन्न

क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा पार पडला.
KL Rahul Athiya Shetty Wedding: शुभमंगल सावधान! अखेर आथियाने घेतली KL राहुलची विकेट; विवाहसोहळा संपन्न

KL Rahul Athiya Shetty Wedding: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा पार पडला. खंडाळ्याच्या फॉर्म हाऊसवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाला जवळपास १०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

क्रिडा तसेच मनोरंजन जगतातील अनेक बड्या हस्तींनी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. (KL Rahul)

KL Rahul Athiya Shetty Wedding: शुभमंगल सावधान! अखेर आथियाने घेतली KL राहुलची विकेट; विवाहसोहळा संपन्न
ICC Mens T20I Team 2022: आयसीसीच्या T20 संघात टीम इंडियाचाच जलवा! सुर्यकुमारसह 'या' तीन खेळाडूंना स्थान

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना 21 जानेवारीपासून सुरुवात झाली होती . या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. या सोहळ्याची सुरुवात सजावटीपासून झालेली दिसून येत होती. लग्नासाठी फक्त 100 पाहुण्यांची यादी तयार कण्यात आली असल्याचं सांगण्यात आले होते.

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये सलमान खान, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जॅकी श्रॉफ पासून अक्षय कुमार पर्यंत सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात होते. (Bollywood )

KL Rahul Athiya Shetty Wedding: शुभमंगल सावधान! अखेर आथियाने घेतली KL राहुलची विकेट; विवाहसोहळा संपन्न
Womens Cricket: Team India च्या पोरींचीही कमाल! ICC च्या T20 संघात मिळवले 4 खेळाडूंनी स्थान

ग्रॅंड रिसेप्शन कधी होणार?

लग्नसोहळ्यादरम्यान सुनील शेट्टी म्हणाले,"केएल राहुल हा माझा जावई नसून मुलगाच आहे. मी जरी नात्याने त्याचा सासरा असलो तरी तो माझा मुलगाच आहे. अथिया आणि केएल राहुलचं रिसेप्शन आयपीएलनंतर (IPL) होणार आहे. लग्नानंतर सुनील शेट्टीने मुलगा अहान शेट्टीबरोबर पापाराझींना पोज दिल्या. तसेच मिठाईदेखील वाटली.

या लग्नाचे फोटो दोघांनीही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत..

अशी होती लवस्टोरी...

अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com