
ICC Women's T20I Team 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) 2022 चा सर्वोत्कृष्ट महिला T20 संघ जाहीर केला आहे. या संघांत, आयसीसीने 2022 वर्षात टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना निवडलं आहे. या संघात सर्वाधिक चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे तीन आणि न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयसीसीने (ICC) २०२२ चे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महिला टी ट्वेंटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने घोषित केलेल्या या संघात भारतीय महिला खेळाडूंचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये स्मृती मंधाना, दिप्ती शर्मा, रिचा घोष, आणि रेणुका सिंग या भारतीय महिला खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. आयसीसीने महिला संघाचे नेतृत्व न्यूझीलंडच्या सोफी डिवाईनकडे देण्यात आले आहे.
ICC सर्वोत्कृष्ट T20 महिला संघ 2022
स्मृती मानधना (भारत)
बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया)
सोफी डिव्हाईन (कर्णधार, न्यूझीलंड)
अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
निदा दार (पाकिस्तान)
दीप्ती शर्मा (भारत)
रिचा घोष (यष्टीरक्षक, भारत)
सेफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
इनोका रणवीरा (श्रीलंका)
रेणुका सिंग (भारत)
महिला खेळाडूंनी केली होती जबरदस्त कामगिरी....
2022 मध्ये टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. यामुळेच भारताच्या बहुतेक खेळाडूंना ICC टीम ऑफ द ईयरमध्ये स्थान मिळाले. भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 594 धावा केल्या होत्या. यादरम्यान तिने 5 अर्धशतकं झळकावली.
ऑफस्पिनर दीप्ती शर्माने गतवर्षी 29 विकेट घेत गोलंदाजीत कमाल केली होती. सर्वाधिक विकेट घेणारी ती तिसरी गोलंदाज ठरली. टीम इंडियाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने फलंदाजीसोबतच विकेटकीपिंगमध्येही चमक दाखवली. तिच्या बॅटमधून 259 धावा निघाल्या. यादरम्यान आणखी एक भारतीय गोलंदाज रेणुका सिंगनेही कमाल गोलंदाजी केली आणि एकूण 22 विकेट घेतल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.