Jailer 2 Set Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Jailer 2 Set Accident: रजनीकांतच्या ‘जेलर 2’ चित्रपटाच्या सेटवर भीषण दुर्घटना घडली. विजेचा धक्का लागून २८ वर्षीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Shruti Vilas Kadam

Jailer 2 Set Accident: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘जेलर 2’ चित्रपटाच्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजेचा धक्का लागून एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव कार्तिकेयन असून तो २८ वर्षांचा होता. कार्तिकेयन चित्रपटाच्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. चेन्नईतील पनैयूर परिसरातील खासगी फिल्म स्टुडिओमध्ये ‘जेलर 2’चे शूटिंग सुरू होते. सेट उभारणीचे काम सुरू असताना कार्तिकेयनला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला.

घटनेनंतर सेटवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रजनीकांत दुपारी शूटिंगसाठी सेटवर येणार होते, मात्र दुर्घटनेनंतर दिवसाचे शूट रद्द करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, घरासारख्या सेटची उभारणी करताना हा अपघात घडला. विजेची गळती, निष्काळजीपणा किंवा सुरक्षेत कमी नेमक्या कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. कनाथूर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून अद्याप अधिकृत एफआयआर दाखल झालेली नाही.

जेलर 2’ हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार करत आहेत. चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत एस. जे. सूर्या, राम्या कृष्णन, योगी बाबू, विद्या बालन आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghol Bhaji: पावसाळ्यात खा गावरान स्टाईल घोळची भाजी; जाणून घ्या घरी बनवण्याची सोपी रेसिपी

8th Pay Commission : सरकारने या फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांचा पगार थेट ₹51000 होणार? समजून घ्या कॅलक्युलेशन

Rahul Gandhi : प्रधानांनी राजीनामा द्यावा, मोदींनी माफी मागावी; लाठीचार्जवर राहुल गांधी संतापले, म्हणाले...

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या जंतर मंतर येथील उपोषणाला नंदुरबार जिल्ह्यातून पाठिंबा

Crime: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी अर्धनग्न अवस्थेत कालव्यात आढळला तरुणीचा मृतदेह

SCROLL FOR NEXT