Raja Shivaji Spoiler Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' हिट होताच रितेश देशमुखची चाहत्यांना विनंती; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला...

Raja Shivaji Spoiler: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे स्पॉयलर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका, अशी विनंती रितेश देशमुखने प्रेक्षकांना केली आहे. चित्रपटाचा अनुभव जपण्यासाठी ही विनंती अभिनेत्याने केली आहे.

Shruti Vilas Kadam

Raja Shivaji: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख सध्या त्याच्या ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपटा काल १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतानाच, रितेशनं एक महत्त्वाची विनंती प्रेक्षकांकडे केली आहे.

रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील कोणतेही दृश्य, संवाद किंवा महत्त्वाचे प्रसंग सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत, असे आवाहन केले आहे. त्याच्या मते, अशा प्रकारचे स्पॉयलर व्हिडिओ इतर प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात.

रितेश देशमुखने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, नमस्कार! आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'राजा शिवाजी' हा आमचा चित्रपट नुकताच तुम्हा सर्वांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा स्वत:चा समजून तुम्ही इतक्या प्रेमाने पाहाताय, चित्रपटाला संपूर्ण देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी आणि ‘राजा शिवाजी’ सिनेमाची संपूर्ण टीम तुमची ऋणी आहे. फक्त एक विनंती करू इच्छितो. तुम्हा सर्वांच्या भावना मला समजतायत, तुम्ही थिएटरमध्ये त्याच उत्सुकतेपोटी व्हिडीओ काढून बाहेर शेअर करताय. पण, प्लीज एकच विनंती करतो हे व्हिडीओ पोस्ट करू नका. स्टिल फोटो तुम्ही पोस्ट करा काही खरकत नाही पण, व्हिडिओ नको, कारण, सिनेमा पाहायला जाणाऱ्यांसाठी काही सरप्राईज आहेत त्यांच्याही मनात ही उत्सुकता टिकून राहिली पाहिजे. त्यामुळे प्लीज व्हिडीओ शेअर करू नकात. बाकी तुमचा प्रतिसाद असाच असूद्यात! जय शिवराय!”

राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात अनेक महत्त्वाचे प्रसंग आणि भावनिक क्षण आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख व्यतिरिक्त जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT