Famous Actress Divorce : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट, २ मुलांच्या आईच्या आयुष्यात वादळ

Actress Divorce After 5 Years Of Marriage : बॉलिवूड अभिनेत्रीचा लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट झाला आहे. अभिनेत्रीला दोन मुलं देखील आहेत.
Actress Divorce After 5 Years Of Marriage
Famous Actress Divorce saam tv
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेत्रीचा घटस्फोट

लग्नाच्या ५ वर्षांनी संसार मोडला.

अभिनेत्री २ मुलांची आई आहे.

बॉलिवूडमधील धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एव्हलिन शर्माने लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. अभिनेत्रीने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन आणि उद्योजक तुषान भिंडी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. आता या दोघांना दोन मुलं देखील आहेत.

‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना एव्हलिनने तिच्या घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिने सांगितले की, "हो, आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्ही आमच्या मुलांना एकत्र वाढवू. आम्ही विनंती करतो की आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. तुषान आणि मी परस्पर संमतीने वेगळे होत आहोत. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नाही. आम्ही आता आयुष्यभराच्या मैत्रीचा आणि सह-पालकत्वाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत..."

लग्नानंतर एव्हलिन गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या मुलांसोबतच सुंदर फोटो शेअर करते. एव्हलिन आणि तुषान भिंडी यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला होता. अवा रानिया भिंडी आणि आर्डन भिंडी असे त्यांच्या मुलांची नावे आहेत.

एव्हलिन शर्माचे करिअर

एव्हलिन शर्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात 'ये जवानी है दिवानी', 'मैं तेरा हीरो', 'यारियां', 'साहो', 'नौटंकी साला', 'जब हॅरी मेट सेजल' आणि 'हिंदी मीडियम' या सिनेमांचा समावेश आहे. एव्हलिनने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'फ्रॉम सिडनी विथ लव्ह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्री शेवटची 'साहो' या चित्रपटात दिसली.

Actress Divorce After 5 Years Of Marriage
Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; रेस्टॉरंटमध्ये आढळला मृतदेह, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com