Shruti Atre SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shruti Atre : लोकप्रिय खलनायिका लवकरच होणार आई, पाहा प्रेग्नन्सी फोटोशूट

Shruti Atre Pregnancy : मराठमोळी अभिनेत्री आता लवकरच आई होणार आहे. ही आनंदाची बातमी तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

आजकाल प्रेक्षकांना हिरोईनसोबत मालिकेतील खलनायिका देखील तितकीच आवडत आहे. खलनायिकेमुळे मालिकेची शोभा वाढते. आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मालिकेत खलनायिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांकडून प्रेम मिळवले आहे. अशाच एका अभिनेत्रीने आता चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील खलनायिका म्हणजे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्रुती अत्रे (Shruti Atre Pregnancy ) लवकरच आई होणार आहे. तिने नुकतीच आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. तिने 'मदर्स डे'च्या निमित्ताने ही खास बातमी चाहत्यांना दिली आहे. तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो नवऱ्यासोबत शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. या फोटोला तिने खूपच भावनिक कॅप्शन दिलं आहे.

श्रुती अत्रे पोस्ट

"हा मातृदिन वेगळा आहे.

आमचे कुटुंब आता मोठ होणार आहे. ही सर्वात सुंदर बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

प्रवास सोपा नव्हता... गुंतागुंत होती, अश्रू होते आणि भीतीचे क्षण होते. पण या सर्वांमध्ये खूप प्रेम होते...या काळात माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले.

प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!"

राजा राणीची गं जोडी

श्रुती अत्रेला 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने राजश्री ढाले पाटील अशी खलनायिकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. यानंतर श्रुती अत्रेला हिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT