Raid 2 Worldwide Collection : 'रेड 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अजय देवगणच्या चित्रपटानं जगभरात कमावले 'इतके' कोटी

Raid 2 Box Office Collection Day 10 : अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाने जगभरात किती कोटींची कमाई केली आहे , जाणून घेऊयात. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे.
Raid 2 Worldwide Collection
Raid 2 Box Office CollectionSAAM TV
Published On

अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा 'रेड 2' (Raid 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तगडे कलेक्शन केले आहे. 'रेड 2' चित्रपट 1 मे प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच चित्रपटाने जगभरात 137.8 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'रेड 2'ने दुसऱ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला आहे, जाणून घेऊयात.

'रेड 2' ने बॉक्स ऑफिस दिवस 10

  • दिवस पहिला - 19.25 कोटी

  • दिवस दुसरा - 12 कोटी

  • दिवस तिसरा - 18 कोटी

  • दिवस चौथा - 22 कोटी

  • दिवस पाचवा - 7.50 कोटी

  • दिवस सहावा - 6.75 कोटी

  • दिवस सातवा - 4.52 कोटी

  • दिवस आठवा - 5.33 कोटी

  • दिवस नववा - 5 कोटी

  • दिवस दहावा - 8 कोटी

  • एकूण - 108.75 कोटी

'रेड 2' स्टारकास्ट

'रेड 2'मध्ये अजय देवगण ( Ajay Devgn) आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत तर रितेश देशमुखने ( Riteish Deshmukh) खलनायकाची भूमिकेत झळकला आहे. 'रेड 2' चित्रपटात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे. 'रेड 2'ला देखील 'रेड' सारखे यश मिळत आहे. भविष्यात 'रेड 2' चित्रपट मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे बोले जात आहे.

'रेड 2' ओटीटी रिलीज अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड २' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 'रेड २' चित्रपट जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

Raid 2 Worldwide Collection
Amitabh Bachchan : "दे दिया सिंदूर..."; बिग बींनी अखेर मौन सोडलं, पहलगाम हल्ल्यावर दिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com