पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Terror Attack ) निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घटनेवर सर्व क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. या घटनेपासून मनोरंजन विश्वातून ही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता बॉलिवूडच्या बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिला आहे.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तब्बल 19 दिवसांनंतर या घटनेवर मौन सोडले आहे. त्याने ट्विटरवर पोस्ट करून आपले मत मांडले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
"टी ५३७५
सुट्टी साजरी करत असताना, त्या राक्षसाने निष्पाप जोडप्याला बाहेर ओढले, पतीला नग्न केले आणि तो कोणत्या धर्माचा आहे हे समजल्यावर त्याच्यावर गोळीबार सुरू केला. पत्नी गुडघे टेकून रडत त्याच्यासमोर माझ्या पतीला मारू नका अशी विनंती केल्यानंतरही; त्या राक्षसाने तिच्या पतीला निर्घृणपणे गोळी मारून पत्नी विधवा केले.
जेव्हा बायको म्हणाली "मलाही मार"!!
तर राक्षस म्हणाला, "नाही!
तू जाऊन सांग "…"!
मुलीच्या मानसिक स्थितीपाहून मला पूज्य बाबूजींच्या कवितेतील एक ओळ आठवली
"है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया "
तर "..."
सिंदूर दिला!
ऑपरेशन सिंदूर!
जय हिंद
जय हिंदची सेना
तू ना थमें गा कभी ; तू न मुड़ेगा कभी ; तू न झुकेगा कभी
कर शपथ , कर शपथ, कर शपथ !
अग्नि पाथ! अग्नि पाथ ! अग्नि पाथ !"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.