Nandurbar: 'कर्तव्य हाच धर्म' घरी भावाचं लग्न, सैन्यदलाकडून बोलावणं आलं, लग्नाआधीच कर्तव्यावर रवाना

Nandurbar Soldiers Patriotic Act: आपल्या भावाच्या लग्नासाठी गेलेल्या जवानाला सैन्यदलाकडून तातडीची हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आदेश मिळाल्यानंतर त्यांनी भावाचे लग्न अर्ध्यावर सोडून परतीची वाट धरली.
Nandurbar
NandurbarSaam
Published On

कर्तव्य हाच धर्म… हेच नंदुरबारच्या जवानाने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. आपल्या भावाच्या लग्नासाठी गेलेल्या जवानाला सैन्यदलाकडून तातडीची हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आदेश मिळाल्यानंतर त्यांनी भावाचे लग्न अर्ध्यावर सोडून परतीची वाट धरली. यावेळी गावातील नागरिकांनी डीजेवर देशभक्तीपर गीत वाजवत, सन्मानपूर्वक त्यांना पाठवले.

किशोर माळी हे जवान केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत आहेत. ते मुळचे नंदुरबारच्या माळीवाडीतील रहिवासी. १४ मे रोजी किशोर यांच्या भावाचे लग्न होते. घरात लग्नाची धामधूम सुरू होती. मात्र, काही तासांपूर्वीच त्यांना सैन्यदलाकडून परत बोलावण्यात आलं.

Nandurbar
India-Pakistan: भारत पाकिस्तानातील तणाव वाढला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने बोलावण्यात आले. किशोर माळी यांनी कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तातडीने परतीच्या प्रवासाची वाट धरली.

Nandurbar
Raigad: 'पाकिस्तानला समर्थन' रायगडच्या युवकाची पोस्ट व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

किशोर यांना पाठवण्यासाठी संपूर्ण गावकरी त्यांच्या घराबाहेर जमले. माळीवाड्यातील नागरिकांनी डीजेवर देशभक्तीची गाणी लावत, जल्लोषात त्यांना निरोप दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com