Raid 2 Teaser: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raid 2 Teaser: पटनायक पुन्हा आला, १ मे रोजी टाकणार रेड; दादा भाई रितेशने भाव खाल्ला

Raid 2 Movie: अजय देवगन अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रेड २’ चा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे.

Shruti Vilas Kadam

Raid 2 Teaser: अजय देवगन अभिनीत आणि राजकुमार गुप्ता दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रेड २’ चा टीझर गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये त्याने सांगितले की, " त्याची ७४वी रेड झाली आणि आता ७५वी रेड दादा भाईच्या घरावर असेल." या टीझरने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला असून, हा चित्रपट १ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

टीझरमधील खास गोष्टी

‘रेड २’ च्या टीझरमध्ये अजय देवगनचा दमदार अंदाज पाहायला मिळतो. एका दृश्यात तो म्हणतो, "ये पांडव कबसे महाभारत रचने लगे?" यावर तो स्वतःच उत्तर देतो, "मैने कब कहा की मैं पांडव हूँ? मैं तो पूरी महाभारत हूँ." हा संवाद त्याच्या व्यक्तिरेखेची ताकद आणि आत्मविश्वास दर्शवतो. टीझरमध्ये रितेश देशमुखच्या दादा भाई या व्यक्तिरेखेचीही झलक दिसते, जो कायद्याचा मालक असल्याचा दावा करतो. या दोघांमधील टक्कर चित्रपटातील मुख्य आकर्षणाचा भाग असणार आहे.

नवीन शहर, नवीन आव्हान

‘रेड’ चित्रपटात अमय पटनायकने लखनऊमध्ये एका बड्या व्यक्तीवर छापा टाकला होता. आता ‘रेड २’ मध्ये तो नवीन शहरात नवीन फाइल घेऊन परतला आहे. टीझरमध्ये दाखवलेल्या दृश्यांवरून असे दिसते की, या वेळी त्याला आणखी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाचा सामना करावा लागणार आहे. रितेश देशमुख एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याची व्यक्तिरेखा कायद्यावर नियंत्रण ठेवणारी अशी आहे.

कलाकार आणि निर्माते

या चित्रपटात अजय देवगन आणि रितेश देशमुख यांच्यासह वाणी कपूर आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘रेड २’ ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी टी-सीरीज आणि पॅनोरामा स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच याही वेळी राजकुमार गुप्ता दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT