Sikander Advance Booking: 'छावा'ला 'सिकरंदर'ची टक्कर; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच केली 'इतकी' कमाई

Sikander Day 1 Prediction : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या रिलीजला आता दोनच दिवस शिल्लक आहेत.
Sikander Advance Booking
Sikander Advance Bookingsaam Tv
Published On

Sikander Advance Booking: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या रिलीजला आता दोनच दिवस शिल्लक आहेत आणि चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, प्रश्न असा आहे की, हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करेल? सध्या मिळालेल्या माहितीनुसार, ‘सिकंदर’ चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगली सुरुवात झाली आहे.

सिकंदर’ हा चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी केले असून, सलमान खानसोबत रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट साजिद नाडियाडवाला यांच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट आणि सलमान खान फिल्म्स या बॅनरखाली तयार झाला आहे.

Sikander Advance Booking
Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अ‍ॅडव्हान्स बुकिंगची जोरदार सुरुवात

‘सिकंदर’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मंगळवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्या काही तासांतच त्याने चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, बुधवारी सकाळपर्यंत या चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी २.५ कोटी रुपये (नेट) ची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे, जी २.९५ कोटी रुपये (ग्रॉस) इतकी आहे. याशिवाय, नॅशनल मल्टिप्लेक्समध्ये २८,००० तिकिटांची विक्री झाली आहे. ही आकडेवारी ब्लॉक केलेल्या सीट्सशिवाय आहे, म्हणजेच येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Sikander Advance Booking
Sachin Tyagi : मुस्लीम पत्नीसाठी 'हा' हिंदू अभिनेता ठेवतो रोजा; चाहते म्हणाले, 'समाजाला एकत्र आणण्यासाठी...'

चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून दोन दिवस बाकी असताना, गुरुवारी दुपारपर्यंत अ‍ॅडव्हान्स बुकिंग ३.३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. या चित्रपटाला देशभरात ११,३०० हून अधिक शो मिळाले आहेत आणि रविवारपर्यंत ही संख्या २०,००० पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. सलमान खानच्या ब्रँडमुळे थिएटरमध्ये तिकीट खिडकीवरही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचा अंदाज

ट्रेड तज्ज्ञांच्या मते, ‘सिकंदर’ हा चित्रपट पहिल्या दिवशी ४५ ते ५० कोटींची कमाई करू शकतो. हा अंदाज चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादावर आणि सलमान खानच्या स्टार पॉवरवरून लावला जात आहे. ट्रेलरने प्रदर्शनानंतर ३६ दशलक्ष व्ह्यूज मिळवले असून, हिंदी चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये २० दशलक्ष व्ह्यूज सर्वात जलद गाठणारा पहिला ट्रेलर ठरला आहे. तसेच, काही तज्ज्ञांचे मत जर चित्रपटाला प्रदर्शनानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर तो ५० कोटींचा टप्पा सहज ओलांडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com