Sachin Tyagi
Sachin TyagiSaam Tv

Sachin Tyagi : मुस्लीम पत्नीसाठी 'हा' हिंदू अभिनेता ठेवतो रोजा; चाहते म्हणाले, 'समाजाला एकत्र आणण्यासाठी...'

Sachin Tyagi Story: स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील मनीष गोयंका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता सचिन त्यागी याने रमजानमध्ये आपली मुस्लिम पत्नी रक्षंदा खानसाठी रोजा ठेवला आहे.
Published on

Sachin Tyagi : स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील मनीष गोयंका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता सचिन त्यागी याने यंदाच्या रमजानमध्ये आपली मुस्लिम पत्नी रक्षंदा खानसाठी रोजा ठेवला आहे. या जोडप्याने आपल्या आंतरधर्मीय विवाहातून प्रेम आणि समंजसपणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

सचिन आणि रक्षंदा यांची भेट २००८ मध्ये ‘कभी कभी प्यार कभी कभी यार’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि १८ मार्च २०१४ रोजी हे कपल लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर सचिनने रक्षंदासोबत रमजानमध्ये रोजा ठेवण्यास सुरुवात केली. एका मुलाखतीत सचिन म्हणाला, “सुरुवातीला ३० दिवस रोजा ठेवणे मला कठीण वाटले, पण रक्षंदासोबत हा अनुभव घेतल्यावर मला त्याचे महत्त्व समजले. यामुळे आमचे नाते आणखी दृढ झाले आहे.”

Sachin Tyagi
Santosh Juvekar: 'मी तलवारीशीही बोलायचो...'; ट्रोल होणाऱ्या संतोष जुवेकरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

रक्षंदा खान स्वतः एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. रक्षंदाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहेत. या कपलला एक मुलगी असून त्यांचे कुटुंब प्रेम आणि एकतेने नटलेले आहे. सचिन यांनी इस्लाम समजून घेण्यासाठी हदीस वाचली आणि त्याच्या पत्नीच्या धार्मिक भावनांचा आदर करत रमजानमध्ये सहभाग घेतला.

Sachin Tyagi
Virat Kohli: किंग कोहली करणार टीव्हीवर डेब्यू? 'या' मालिकेत दिसणार विराट, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

सोशल मीडियावर या कपलच्या या एकतेचे कौतुक होत आहे. अनेक चाहत्यांनी याला ‘इंटरफेथ हार्मनी’चा सुंदर नमुना म्हटले आहे. एका चाहत्याने लिहिले, “सचिन आणि रक्षंदा यांच्यासारखे कपल खऱ्या अर्थाने समाजाला एकत्र आणतात.” तर दुसऱ्या एकाने म्हटले, “धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि आदर दाखवणारा हा एक उत्तम दाखला आहे.”

ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची आवडत आ. या मालिकेतील सचिनचे मनीष गोयंका हे पात्रही तितकेच लोकप्रिय आहे. त्यांच्या या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयाने चाहत्यांना त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com