Virat Kohli: किंग कोहली करणार टीव्हीवर डेब्यू? 'या' मालिकेत दिसणार विराट, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

virat kohli TV Debut: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहली टीवी डेब्यू करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
virat kohli TV Debut
virat kohli TV DebutSaam Tv
Published On

Virat Kohali: भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने टीव्हीवर पदार्पण केले आहे का? हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक फोटो आहे, जो पाहून तुम्हाला वाटेल की खरंच दोन माणसांची चेहरे इतके सारखे असू शकतात का? तुर्की अभिनेता कॅव्हिट चेटिन गुनर हा हुबेहूब विराट कोहलीसारखा दिसतो, यामुळे इंटरनेटवर याबाबत जोक्स आणि चर्चा सुरू झाल्या आहेत.

हा मजेशीर प्रकार रेडिटवरून सुरू झाला. एका नेटकऱ्याने तुर्की मालिका ‘दिरिलिस: एर्तुग्रुल’ मधील कॅव्हिट चेटिन गुनर याचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “अनुष्का शर्माच्या पतीचे टीव्ही शोमध्ये पदार्पण.” हा फोटो पाहून अनेकांना खरंच वाटले की हा विराट कोहलीच आहे. या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली.

virat kohli TV Debut
Santosh Juvekar: 'मी तलवारीशीही बोलायचो...'; ट्रोल होणाऱ्या संतोष जुवेकरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

एका नेटकऱ्याने लिहिले, “मी पहिल्यांदा या मालिकेतील डोगन बे या पात्राला पाहिले तेव्हा मला वाटले, विराट कोहली तुर्की मालिकेत काय करतोय? दुसऱ्या नेटकऱ्याने चक्क अनुष्का शर्माला टॅग करत म्हटले, “अनुष्का, तुझा नवरा खरंच टीव्हीवर आला आहे का?” तर काहींनी लिहिले, “नेपोटिझम आता हाताबाहेर गेले आहे.”

virat kohli TV Debut
Archana Puran Singh: '१०० ऑडिशन्स देऊनही...' अर्चना पूरण सिंगच्या मुलाला नेपोटिज्ममुळे काम नाही; आई दिला दोष

दिरिलिस: एर्तुग्रुल’ ही तुर्की ऐतिहासिक मालिका असून १३व्या शतकातील एर्तुग्रुल बे यांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत कॅव्हिट चेटिन गुनर हा डोगन आल्प नावाच्या पात्राची भूमिका साकारतो. ही मालिका २०१४ ते २०१९ पर्यंत प्रसारित झाली आणि भारतासह जगभरात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील कॅव्हिटचा लूक आणि विराट कोहली यांच्यातील साम्य पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा स्टार खेळाडू आहे. तो अनेक जाहिरातींमध्ये दिसला असला तरी त्याने कधीही चित्रपट किंवा मालिकेत काम केलेले नाही. पण या व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना मजेशीर प्रश्न पडला आहे की, “हा खरंच विराट आहे की त्याचा जुळा भाऊ?”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com