Raid 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raid 2 Box Office Collection : अजय देवगणच्या 'रेड 2'नं अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ला टाकलं मागे, कलेक्शनचा आकडा किती?

Raid 2 Box Office Collection Day 14 : अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने 'स्काय फोर्स'ला कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.

Shreya Maskar

अजय देवगण ( Ajay Devgn) आणि रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) यांचा 'रेड 2' (Raid 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता या चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ला मागे टाकले आहे. 'रेड 2' चित्रपट 1 मे प्रेक्षकांच्या भेटीला आला. चौदा दिवसांत अजय आणि रितेशच्या 'रेड 2' चित्रपटाने जगभरात 174.25 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची (Box Office Collection) कमाई, जाणून घेऊयात.

'रेड 2' ने बॉक्स ऑफिस दिवस 14

  • दिवस पहिला - 19.25 कोटी

  • दिवस दुसरा - 12 कोटी

  • दिवस तिसरा - 18 कोटी

  • दिवस चौथा - 22 कोटी

  • दिवस पाचवा - 7.50 कोटी

  • दिवस सहावा - 6.75 कोटी

  • दिवस सातवा - 4.52 कोटी

  • दिवस आठवा - 5.33 कोटी

  • दिवस नववा - 5 कोटी

  • दिवस दहावा - 8 कोटी

  • दिवस अकरा - 11.75 कोटी

  • दिवस बारावा - 4.85 कोटी

  • दिवस तेरावा - 2.6 कोटी

  • दिवस चौदा - 3.35 कोटी

  • एकूण - 133.45 कोटी

'रेड 2' मोडला 'स्काय फोर्स'चा रेकॉर्ड

अजय देवगणच्या 'रेड २' चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'रेड २' 2025 ची सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133.45 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर 'स्काय फोर्स' चित्रपटाने 131.44 कोटी कमावले आहे.

'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक हे कलाकार देखील पाहायला मिळत आहेत. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे. 'रेड २' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT