Box Office Collection: 'रेड २' ने बॉक्स ऑफिसवर वीकेंडला केला धमाका, 'केसरी २' आणि इतर चित्रपटांचा गल्ला किती?

Weekend Box Office: 'रेड २' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. रविवारी 'रेड २' आणि इतर चित्रपटांनी केलेल्या कमाईचा आढावा घ्या.
Box Office Collection
Box Office Collectiongoogle
Published On

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश तणावाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या अजय देवगणच्या 'रेड २' या चित्रपटाला मोठा फायदा मिळाला आहे. 'रेड २'ने आपल्या प्रदर्शनाचे ११ दिवस पूर्ण केले असून दुसऱ्या आठवड्यात त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे.

दुसरीकडे, 'हिट ३' आणि 'रेट्रो' हे दोन दक्षिण भारतीय चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. त्याचवेळी अक्षय कुमारचा 'केसरी २' हा चित्रपट देखील रिलीजनंतर २४ दिवस झाले तरी बॉक्स ऑफिसवर आपले मजबूत अस्तित्व टिकवून आहे.

रेड २

अजय देवगणच्या रेड २ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. या आठवड्यात नवीन चित्रपट न आल्याने रेड २ला फायदा झाला. रविवारी म्हणजेच ११ व्या दिवशी चित्रपटाने ११.७५ कोटींची कमाई केली असून, एकूण कमाई आता १२०.७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

'रेड २' चित्रपटाला प्रेक्षकांच्या 'वर्ड ऑफ माउथ'चा चांगला फायदा होत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बहुतांश लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. कथानक लोकांना आवडले असून ते प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. ट्रेलर पाहून जरी कथा साधारण वाटली होती, तरी प्रत्यक्षात चित्रपटाने अपेक्षा बदलल्या. अजय देवगणसोबत रितेश देशमुख, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हिट ३ आणि रेट्रो

'रेड २'सोबत 'हिट ३' आणि 'रेट्रो' हे दोन दक्षिण भारतीय चित्रपटही प्रदर्शित झाले. यामध्ये 'हिट ३'ने सुरुवातीपासूनच 'रेट्रो'वर आघाडी घेतली आहे. रविवारी 'हिट ३'ने २.२५ कोटींची कमाई करत एकूण ७१.६५ कोटींचा गल्ला जमवला. दुसरीकडे रेट्रोने फक्त १.४८ कोटी कमावले असून ११ दिवसांत त्याची एकूण कमाई ५७.१८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

केसरी २

'रेड २'ने जोरदार कमाई केली असली तरी अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर माधवन यांचा 'केसरी २'ही अजून बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. रिलीजनंतर २४ दिवसांनीही 'केसरी २'ने रविवारी १.७५ कोटींची कमाई केली असून, आतापर्यंत चित्रपटाने एकूण ८६.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com