Raghav Juyal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

Raghav Juyal New Bungalow : बॉलिवूडचा सुपरस्टार राघव जुयाल ५ मजली आलिशान बंगला बनवत आहे. नुकत्याच फराह खानसोबत झालेल्या मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला.

Shreya Maskar

राघव जुयाल स्लो मोशन किंग म्हणून ओळखला जातो.

राघव जुयाल नुकताच 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये झळकला होता.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर राघव जुयाल ५ मजली बंगला बांधत आहे.

स्लो मोशन किंग राघव जुयाल सध्या त्याचा चित्रपट 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे चांगला चर्चेत आहे. त्याच्या अभिनयाची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. तो एक प्रसिद्ध डान्सर, अभिनेता आणि होस्ट बनला आहे. अलिकडेच राघव जुयाल (Raghav Juyal ) कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानच्या यूट्यूब व्हीलॉगमध्ये दिसला. राघवने फराह खानच्या घरात एका बॉडीगार्डसह स्टायलिश एन्ट्री घेतली.

फराह खानने राघव जुयालला विचारले की, "'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'ला मिळालेल्या यशानंतर तुझ्या आयुष्यात काय बदल झाला का? त्यावर उत्तर देत राघव म्हणाला, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'ने मला प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवून दिली. मी प्रवासादरम्यान अरबी शिकली आहे. कधीकधी मी अचानक अरबीमध्ये गाणे सुरू केले की माझा ड्रायव्हर राम घाबरायचा..."

पुढे राघव जुयाल म्हणाला की, "मी डेहराडूनमध्ये एक मोठे घर बांधत आहे. ही पाच मजली इमारत असणार आहे. जेव्हा ते घर तयार होईल तेव्हा तुम्ही तेथे दुसरा व्हिडीओ शूट करा." राघव जुयालचे मुंबईत देखील स्वतःचे घर आहे.

राघव जुयाल वर्कफ्रंट

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये काम करण्यापूर्वी राघव जुयालने सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' मध्येही काम केले होते. तसेच राघव जुयालने एबीसीडी २, किल, स्ट्रीट डान्सर 3 डी, ग्यारह ग्यारह यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. राघव जुयालचे चाहते आता त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT