Shreya Maskar
आज (10 जुलै) 'किंग ऑफ स्लो मोशन' राघव जुयालचा वाढदिवस आहे.
राघव जुयालला 'किंग ऑफ स्लो मोशन' या नावाने सर्वत्र ओळखले जाते.
राघव जुयालने 2012मध्ये 'डान्स इंडिया डान्स 3'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या डान्सची छाप पाडली.
राघव जुयालला 'स्लो मोशन किंग' हे नाव स्लो मोशन नृत्यशैलीमुळे मिळाले.
'डान्स इंडिया डान्स ' या रिॲलिटी शोमध्ये त्याच्या स्लो मोशन डान्स शैलीचे खूप कौतुक झाले.
आजवर राघवला आपल्या हटके डान्स स्टाइलसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
राघवचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर 12.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
राघव डान्ससोबतच आपल्या होस्टिंगमधील कॉमेडीमुळे देखील ओळखला जातो.