R Madhavan controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

R Madhavan: सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन? स्वतःच खुलासा करत म्हणाला, 'चाहत्यांच्या मॅसेजचे...'

R Madhavan controversy: सोशल मीडियावरील गैरसमजामुळे निर्माण झालेल्या वादावर आर माधवनने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच अभिनेत्याने या गोष्टीचा चुकीचा अर्थ न काढण्याची विनंती देखील केली आहे.

Shruti Vilas Kadam

R Madhavan controversy: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आर माधवन अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता, या कार्यक्रमामध्ये त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना दिलेल्या साध्या आणि दयाळू प्रतिसादांचा किती चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो याबद्दलची त्याची निराशा व्यक्त केली. अशाच एका घटनेचे वर्णन करताना त्याने सांगितले की एका तरुणीने त्याला इंस्टाग्रामवर त्याच्या अभिनयाचे कौतुक करणारा संदेश पाठवला आणि शेवटी अनेक हार्ट्स आणि किसिंग इमोजी जोडल्या. प्रत्युत्तरात, माधवनने फक्त आभार मानणारा संदेश पाठवला. तथापि, चाहत्याने तिच्या संदेशाचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो पोस्ट म्हणून शेअर केला, यामुळे लोकांना असे वाटले की तो हार्ट इमोजींना उत्तर देत आहे. अभिनेत्याने सांगितले की त्याचा हेतू फक्त चाहत्याच्या संदेशाला उत्तर देण्याचा होता, परंतु लोकांनी फक्त इमोजी पाहिले आणि त्यामुळे दिशाभूल मत तयार केले. तो म्हणाला की गैरसमज होण्याची भीती असल्याने त्याला सोशल मीडियावर जास्त सावधगिरी बाळगावी लागते.

बिंगू बॉक्सने यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर माधवन एका अॅपच्या लाँचिंगच्या वेळी बोलताना दिसत आहे. तो म्हणाला, “मी एक अभिनेता आहे. मला लोक इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर मला मेसेज करत आहेत. मी तुम्हाला एक साधे उदाहरण सांगतो. एक तरुण मुलगी मला मेसेज करते. ‘मी हा चित्रपट पाहिला. मला तो खरोखर आवडला. मला वाटलं होतं की तू एक उत्तम अभिनेता आहेस. खूप छान. तू मला प्रेरणा देतोस. आणि शेवटी, ती खूप हार्ट्स आणि किसिंग इमोजी पाठवते. आता, जेव्हा एखादा चाहता माझ्याशी इतक्या बोलत असतो, तेव्हा मला त्याला उत्तर देणे भाग आहे. म्हणून मी नेहमीच म्हणतो 'खूप खूप धन्यवाद. गॉड ब्लेस यु.' त्यावर ती माझ्या उत्तराचा स्क्रीनशॉट घेते आणि इंस्टाग्रामवर पोस्ट म्हणून बनवते. आता, लोक काय पाहतात? माधवनने एका मुलीच्या हार्ट्स आणि किसिंग इमोजीवर प्रतिकिया दिली आहे.

त्याने पुढे स्पष्ट केले, "माझा हेतू त्याला उत्तर देण्याचा नव्हता. माझा हेतू तिने केलेल्या कौतुकाचे आभार मानाने हा होता. पण नेटकऱ्यांना फक्त ते इमोजी दिसतात आणि असा समाज होतो की 'अरे मॅडी तरुण मुलींशी बोलत आहे'. तो पुढे म्हणाला की या प्रकारामुळे आणि लोकांनी काढलेल्या चुकीच्या अर्थामुळे कोणत्याही चाहत्यांच्या मॅसेजचे आभार मानण्यास भीती वाटते.

आर माधवनच्या व्यावसायिक आघाडीवर बोलायचे झाले तर,आर माधवन पुढे दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांच्या शास्त्रज्ञ जी.डी. नायडू यांच्यावरील बायोपिकमध्ये दिसणार आहे, ज्याचे नाव 'जी.डी.एन' आहे. तो 'एडिसन ऑफ इंडिया' आणि 'कोइम्बतूरचे संपत्ती निर्माता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूरदर्शी आणि राष्ट्रीय नायक जी.डी. नायडूची आकर्षक भूमिका साकारणार आहे. तो कंगना राणौतसोबत विजयच्या आगामी पॅन-इंडिया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे. नेटफ्लिक्सवरील 'आप जैसा कोई' या आगामी नाटकात माधवन फातिमा सना शेखसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. तो शंकरन नायरच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार आणि अनन्या पांडेसोबतही काम करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT