Chhaava Box Office Collection: आया रे तुफान.... ,छावाची घोडदौड ५०० कोटींच्या दिशेने; रविवारी कमवले 'इतके' कोटी

Chhaava Box Office Collection Day 17: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन १७ दिवस उलटूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षक अजूनही चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत.
Chhaava Movie Box Office Collection
Chhaava Movie Box Office Collection Day 17Saam Tv
Published On

Chhaava Box Office Collection Day 17: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्यातच 'छावा'ने तब्बल २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. हा पीरियड ड्रामा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. ही कथा मराठा साम्राज्याचे आदरणीय दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाभोवती आणि संघर्षांभोवती फिरते.

'छावा'ने १७ व्या दिवशी इतके कोटी कमावले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'छावा'ने १७ व्या दिवशी २५.०० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर त्याचे एकूण कलेक्शन ४५९.२९ कोटी रुपये झाले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात 'छावा'ने २१९.२५ कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपये कमावले.

Chhaava Movie Box Office Collection
Katrina Kaif Video: महाकुंभातील कतरिनाच्या पवित्र्यस्नान व्हिडिओवर रवीना टंडन चिडली; म्हणाली, 'डिझगस्टिन्ग...'

'छावा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १: ३१ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २: ३७ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३: ४८.५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४: २४ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ५: २५.२५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ६: ३२ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ७: २१.५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ८: २३.५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ९: ४४ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १०: ४० कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ११: ७.२ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १२: १८.५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १३: २३ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १४: ४.५८ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १५: ४.९२ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १६: २२ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १७: २५ कोटी

छावा एकूण कलेक्शन ४५९.२९ कोटी

Chhaava Movie Box Office Collection
Oscar Award 2025: भारतात या दिवशी पाहता येणार ऑस्कर सोहळा; वाचा सविस्तर माहिती

छावा बद्दल

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीचे सिनेमॅटिक रूपांतर आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, तर रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. तसेच अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com