Pushpa 2 The Rule SaamTv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Pushpa 2 Trailer Out News : सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2: द रुलचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या सोशल मिडियावर पुष्पा 2 चा हा ट्रेलर धूम घालताना दिसत आहे.

Saam Tv

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2 : द रुल' या चित्रपटाचा ट्रेलर आज (दि.17) रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच काही मिनिटांमध्येच चाहत्यांनी या ट्रेलरला भरपूर पसंती देत डोक्यावर घेतलेलं आहे. सध्या सोशल मिडियावर पुष्पा 2 चा हा ट्रेलर धूम घालताना दिसत आहे. चाहते खूप दिवसांपासून या ट्रेलरची वाट बघत होते. अखेर आज चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. अल्लू अर्जुनची धमाकेदार शैली आणि अभिनय या 2 मिनिटे 48 सेकंदाच्या ट्रेलरमधून बघायला मिळतो आहे.

'पुष्पा 2 : द रुल'चा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम रविवारी अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या उपस्थितीत पाटणा येथे पार पडला. या कार्यक्रमाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चाहत्यांची गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलीसांना या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहे. यावरूनच पुष्पाच्या सिकवेलबद्दल चाहत्यांची क्रेझ समजून आली आहे. या कार्यक्रमादरम्यान अक्षरा सिंहने देखील परफॉर्म केलं. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम असल्याचं चाहत्यांचं म्हणण आहे.

पुष्पा २: द रुलच्या ट्रेलरमधला प्रत्येक सीन मनाला भिडणारा आहे. यामधील दृश्यांबरोबरच पार्श्वसंगीत, संवाद, अभिनय, व्हिज्युअल्स, व्हीएफएक्स या सगळ्याच गोष्टी अतिशय उत्तमपणे मांडण्यात आल्या आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सुकुमार यांच्या 2021 मध्ये आलेल्या पुष्पा: द राइज चित्रपटाचा पुष्पा 2: द रुल हा सिक्वेल आहे. या भागात पुष्पराज आणि एसपी भंवर सिंह शेखावत एकमेकांशी भांडताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात हत्तीच्या तुतारीने होते. तेव्हा मंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने फोनवर कोणाला तरी विचारले - 'कोण आहे हा माणूस, ज्याला ना पैशाची पर्वा आहे, ना सत्तेची भीती. तो नक्कीच खूप दुखावला गेला आहे.' व्हिडीओमध्ये पुढे पुष्पा भांडताना दिसत आहे. तेवढ्यात आवाज येतो, पुष्पा, अडीच अक्षरं… नाव लहान आहे, पण आवाज खूप मोठा आहे.

पुष्पा हे फक्त नाव नाही, पुष्पा म्हणजे ब्रँड. यावेळी अल्लू अर्जुनचा ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'' हा डायलॉग चाहत्यांनी चांगलाच उचलून धरला आहे. दरम्यान, पहिल्या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. आता निर्माते आणि पुष्पाच्या चाहत्यांना दुसऱ्या भागाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता दुसरा भाग किती धमाकेदार असेल हे पाहायचं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT