Nayanthara : ३ सेकंदाच्या क्लिपसाठी धनुष्य अन् नयनतारा यांचा वाद कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Nayanthara Instagram Post: अभिनेत्री नयनतारा नयनतारा :बियॉण्ड द फेयरी टेल या डॉक्युमेंट्रीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
 Nayanthara
NayantharaSaam Tv
Published On

टॉलीवूड अभिनेत्री नयनतारा तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नयनताराची नयनतारा :बियॉण्ड द फेयरी टेल या डॉक्युमेंट्री येत आहे. नयनताराच्या आयुष्यावर आणि प्रेमकहानीवर आधारित ही डॉक्युमेट्रीं आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये अभिनेता धनुषने त्याच्या नानुम राउडी धान चित्रपटातील तीन सेकंदांच्या क्लिपचा वापर केल्याचा दावा केला आहे. यामुळेच नयनतारा :बियॉण्ड द फेयरी टेल च्या निर्मात्यांवर कॉपीराईट हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेता धनुषने १० कोटी रूपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यानंतर आता नयनतारा भडकली आहे. सोशल मीडियावर नयनताराने भलीमोठी पोस्ट शेअर करत धनुषला चागलंच सुनावलं आहे.

 Nayanthara
Like And Subscribe: अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा ‘लाईक आणि सबस्क्राइब’ OTT वर होणार रिलीज! कुठे अन् कधी पाहता येणार?

नयनताराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये तिने, "ही तुमची आतापर्यंतची सर्वात वाईट वागणूक आहे. ऑडिओ लाँचवेळी तुम्ही साध्याभोळ्या चाहत्यांसमोर जसे वागता, त्यातील खरे आणि चांगले गुण तुमच्यात खरोखर असते. तर आज चित्र काही वेगळे दिसले असते. फक्त तीन सेंकदाच्या व्हिडीओसाठी १० कोटींचा कॉपीराईट दावा करणे यातून तुम्ही कशाप्रकारची व्यक्ती आहात हे दिसून येते." केल्यावरून १० कोटी रूपयांच्या दावा केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर नयनताराने भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. तिने धनुषला सणसणीत उत्तर दिलं आहे.

पुढे नयनताराने, ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील काही भाग वापरता यावा यासाठी आम्ही तुम्हाला विनंती केली होती. आम्ही तुम्हाला वारंवार विचारले होते. तुमच्या उत्तराचीही आम्ही वाट पाहिली. मात्र, तुम्ही मुद्दाम आम्हाला एनओसी दिली नाही. या चित्रपटातील गाण्याचा काही भाग आम्हाला हवा होता; मात्र तुम्ही यातील गाणं आणि फोटो घेण्याचीही परवानगी दिली नाही.

 Nayanthara
Rajveer Movie: बॉडीबिल्डर सुहास खामकर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत; अॅक्शनपॅक्ड "राजवीर" चा ट्रेलर लाँच

“शेवटी आम्ही डॉक्युमेंट्रीमधील तो भाग कट करून, पुन्हा एडिट करण्याचा निर्णय घेतला. डॉक्युमेंट्रीमध्ये असलेला भाग ‘नानुम राउडी धान’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यावरदेखील तुम्ही आक्षेप घेतला आणि केवळ तीन सेकंदांसाठी कायदेशीर कारवाई केली.”

“तुम्ही पाठवलेली कायदेशीर नोटीस आम्हाला मिळाली आहे. आता आम्हीदेखील यावर कायदेशीर उत्तरे देऊ. नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीसाठी ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील काही भाग वापरण्यावर तुम्ही आम्हाला नकार दिला होता. त्याने तुम्ही न्यायालयात निकाल तुमच्या बाजूने फिरवू शकाल. मात्र, मला तुम्हाला सांगायचे आहे की, या प्रकरणाची आणखी एक नैतिक बाजू आहे”, पत्रात असे सर्व नमूद करून, शेवटी अभिनेत्रीने ओम नमः शिवाय अशी कॅप्शन लिहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com