Pushpa 2 Box Office Collection Day 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection Day 2: 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, 400 कोटींचा टप्पा पार

Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2' चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने दोन दिवसात बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमावले जाणून घ्या.

Shreya Maskar

'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सर्वांना वेड लावले आहे. अल्लू अर्जुनची जबरदस्त ॲक्शनने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun ) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna ) रोमान्स पाहून चाहते त्यांच्या जोडीला भरपूर प्रेम करत आहे. 'पुष्पा-2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा राज'ची क्रेझ पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection Day 2) दोन दिवसात 265 कोटी रुपये कमावले आहे. तर जगभरात या चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'पुष्पा 2' दिवसेंदिवस जबरदस्त कमाई करत आहे.

'पुष्पा 2' चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा पॅन इंडिया चित्रपट आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाने केजीएफ, जवान, प्राणी, कल्की 2898 एडी सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रत्येक भाषांमध्ये या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाने तेलुगूमध्ये चांगला व्यवसाय केला आहे.

'पुष्पा 2' लीक

'पुष्पा 2' चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासातच लीक झाला. चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पायरसीचा झटका बसला. ज्यामुळे निर्मात्यांना कोट्यावधींचा फटका बसेल. आताही 'पुष्पा 2' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांच्या रांगा पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT