Pushpa 2 Box Office Collection Day1: अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2ची मोठी कमाई; बॉक्स ऑफिसवर मारली Half Century

Pushpa 2 Box Office: सुकुमार-अल्लू अर्जुनचा पुष्पा 2: द रुल बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा भारतीय चित्रपट बनू शकतो. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे. पुष्पा २ हा चित्रपट पहिल्या दिवसाच्या कमाईत 'जवान आणि 'कल्की 2898 ए.डी'. ला पिछाडीवर टाकू शकतो.
Allu Arjun Pushpa
Pushpa 2 Allu Arjun Saam Tv
Published On

अल्लू अर्जुनचा पुष्पा या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेत अल्लू अर्जुनला अख्या देशाचा मोठा सुपरस्टार बनवलं. आता तीन वर्षानंतर अल्लू अर्जुन पु्ष्पा -२ द राइज हा सिनेमा घेऊ आलाय. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. सिनेमागृहात प्रेक्षकांनी मोठी गर्दी केलीय. सचिक डॉट कॉमच्या माहितीनुसार, गुरुवारी प्रदर्शित झालेल्या पुष्पा २ या चित्रपटाने दुपारी वाजेपर्यंत सर्व भाषेत ५८ कोटी रुपयांची कमाई केली.

अमेरिकेत Prathyangira Cinemas च्या ट्विटनुसार, चित्रपटाने फक्त प्रीव्ह्यू शोमध्येच $3.2 दशलक्ष कमावले. सिनेमाज, बुक माय शोचे सीओओ आशिष सक्सेना, म्हणाले, “पुष्पा 2: नियमाने अधिकृतपणे इतिहास निर्माण करेल. या चित्रपटाने आगाऊ विक्रीत तब्बल 3 दशलक्ष तिकिटांची विक्री केलीय, जी भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी सिनेमागृहात चित्रपट पाहण्याठी मोठी गर्दी केलीय.

कोणत्या सिनेमाची मोठी कमाई?

पुष्पा 2: द रुलसाठी हा केवळ विक्रमी मैलाचा दगड नाही, तर भारतीय सिनेमासाठी एक स्मरणीय क्षण निर्माण करणार आहे. वर्षअखेरपर्यंत हा सिनेमा मोठी कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्यात RRR पहिल्या स्थानी आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹223 कोटी कमावले आहेत. तर त्यानंतर बाहुबली (₹217 कोटी) आणि कल्की 2898 AD (₹175 कोटी) कमावले आहेत.

Allu Arjun Pushpa
Pushpa 2: टाळ्या अन् शिट्ट्यांचा जल्लोष; प्रीमियरच्या चेंगराचेंगरीत एका फॅनचा मृत्यू तर चिमुकली गंभीर जखमी

अनेक बॉक्स ऑफिस जाणकारानुसार, पुष्पा 2 ₹ 250 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज आहे. पुष्पा २ चित्रपट सुकूमार यांनी दिग्दर्शित केलाय. तर मैत्री मुव्हीज यांनी या चित्रपटाची निर्माती केलीय. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या भूमिका चाहत्यांना आवडल्या आहेत. पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग हा पहिल्या भागापेक्षा खूप सुंदर झालाय. पहिल्या भागात भैरवसिंग शेखावत आणि पुष्पा यांच्यातील वैर दाखवलं. आता दुसऱ्या भागात दोघांच्या दुश्मनीचा पुढील भाग दिग्दर्शकाने दाखवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com