Celebrity Divorce: पंजाबी चित्रपट अभिनेत्री मँडी ठक्कर हिने तिचा पती शेखर कौशलला घटस्फोट दिला आहे. दिल्लीतील साकेत कुटुंब न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. अभिनेत्री आणि तिच्या पतीने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. मँडीच्या वकिलाने या कपलच्या घटस्फोटाची माहिती माध्यमांना दिली आहे.
पंजाबी अभिनेत्री मँडी ठक्कर हिचे पती शेखर कौशल यांच्याशी जवळजवळ २३ महिने चाललेले लग्न आज संपले आहे. परस्पर संमतीने अर्ज दाखल केलेल्या या कपलचा पहिला घटस्फोट अर्ज शुक्रवारी न्यायालयाने मंजूर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोट अर्ज परस्पर संमतीने दाखल करण्यात आला होता, यामध्ये दोन्ही विचार करुन वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची कार्यवाही झाली. जिथे न्यायालयाने संयुक्त याचिका स्वीकारली आणि दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवले. पहिल्या याचिकेला मंजुरी दिल्यानंतर, परस्पर संमतीने घटस्फोटाच्या तरतुदींनुसार खटला सुरू झाला. मँडी ठक्कर यांचे प्रतिनिधित्व करणारे सेलिब्रिटी वकील इशान मुखर्जी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, कुटुंब न्यायालयाने पहिला घटस्फोट अर्ज मंजूर केला आहे.
भारतीय ब्रिटिश अभिनेत्री मॅंडी ठक्करने भारतीय चित्रपटांमध्ये, विशेषतः पंजाबी चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तिने अनेक हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
शेखर कौशल कोण आहे?
१३ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅंडीने जिम ट्रेनर आणि सीईओ शेखर कौशलशी लग्न केले. हे लग्न हिंदू आणि शीख दोन्ही पद्धतीने पार पडले. पण, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, या कपलने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे वैवाहिक मतभेद खाजगीरित्या आणि सोडवण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.