Ramesh Pardeshi Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramesh Pardeshi Post : "मुलांमुलीकडे लक्ष आहे का?",मॉलमध्ये ड्रग्ज सेवन करणारा व्हिडिओ शेअर करत पिट्या भाईचा पालकांना सवाल

Ramesh Pardeshi Post : मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रमेश परदेशी यांनी पुण्यातील दोन मुली ड्रग्जचे सेवन करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहून संताप व्यक्त केलेला आहे.

Chetan Bodke

दिवसेंदिवस पुण्यातील ड्रग्ज प्रकरणांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील एल- ३ पबमध्ये ड्रग्ज सेवन झाल्याची चर्चा सुरू असताना दोन युवतींचा एका पबच्या वॉशरूममध्ये ड्रग्जचे सेवन करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रमेश परदेशी यांनी पुण्यातील दोन मुली ड्रग्जचे सेवन करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहून संताप व्यक्त केलेला आहे.

'मुळशी पॅटर्न' फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशीने कॅप्शन दिले की, "आधी ललित पाटील, आज फर्ग्युसन रस्त्यावर ड्रग्स पार्टी आणि त्याच दिवशी एका मॉलच्या बाथरूममध्ये ह्या तरुणींचे ड्रग्स सेवन. हेच अश्या प्रकारचं वास्तव मी काही महिन्यापूर्वी दाखवलं (अपवाद चेहरे ब्लर करायचा) त्यांनी तर जे काही व्यसन केल ते तर पब्लिक जागेत ते पण सर्वासमोर आणि ते करताना त्यांना काही फरक पडला नाही. आणि आता ह्या बाथरूममध्ये हे करतायत बिनधास्त. आणि त्यांच सार्वजनिक आयुष्य कस धोक्यात आणले ही तक्रार करून माझे माझ्या कुटुंबाच मानसिक स्वास्थ्य घालावल असो."

"आपले आपल्या शहराकडे आपल्या आणि आजुबाजूला असणार्‍या मुलांमुलीकडे लक्ष आहे का? आपण लक्ष देणार आहोत का? की फक्त प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यावर अवलंबून न राहता एक पालक नागरिक म्हणून पुढची पिढी बरबाद होऊ नये म्हणून काही करणार आहोत का? आणि करणार असाल तर डोळे,कान उघडे करून फिरा. आणि सगळे जण मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याच्या नांगरान नांगरलेल्या पावित्र पुण्यभूमीला जपू.. मी पुणेकर माझं शहर माझा अभिमान... माझी जबाबदारी... (कृपया राजकीय कमेंट नको)"अशी पोस्ट अभिनेता रमेश परदेशीने शेअर केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत? किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी उपाय

Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

Processed Food Side Effect: जास्त प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी

SCROLL FOR NEXT