Priya Marathe Shantanu Moghe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Marathe: मैत्रीणीच्या पार्टीत भेट, प्रेम अन् फिल्मी स्टाईल प्रपोज...; प्रिया मराठे- शंतनू मोघेची अशी आहे क्यूट लव्हस्टोरी

Priya Marathe Shantanu Moghe: आज ३१ ऑगस्ट रोजी मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हीच निधन झाले आहे. तिची कर्करोगाशी सुरु असलेली अपयशी ठरली. प्रियाच्या निधनामुळे शंतनू मोघेच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Priya Marathe Shantanu Moghe Lovestory: आज ३१ ऑगस्ट रोजी मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हीच निधन झाले आहे. तिची कर्करोगाशी सुरु असलेली अपयशी ठरली. वयाच्या फक्त ३८ वर्षी तिचा निधन झाल्यामुळे संपूर्ण मनोरंजनविश्वत आणि शंतनू मोघे व त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. प्रियाच्या उत्तम अभिनय आणि जिवन प्रवासासह अभिनेता शंतनू मोघे आणि मराठी-हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांची लव्हस्टोरी ही आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी आहे.

दोघांची ओळख एका पार्टीत झाली. ही पार्टी प्रियाच्या मित्रिणी शर्वरी लोहकरे यांनी प्लॅन केली होती. याचं पार्टीत प्रिया आणि शंतनूची भेट झाली. त्यावेळी प्रिया अंधेरीमध्ये राहत होती. शंतनूही अभिनय क्षेत्रात असल्यामुळे त्यांची सहज मैत्री झाली. जी पुढे हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली.

अनेक वर्ष डेट केल्यानंतर, शंतनूने तुळजापूरजवळील ‘नव तारका’ या कार्यक्रमात प्रियाला अगदी “फिल्मी स्टाइल” मध्ये प्रपोज केलं. प्रियाचा होकार आल्यावर त्या दोघांनी आपल्या घरातल्यांची मंजुरी घेतली आणि 24 एप्रिल 2012 रोजी विवाह केला. प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून बनली. लग्न थाटात पार पडलं आणि ते मराठी मनोरंजन विश्वातील एक सुंदर क्यूट कपल म्हणून लोकप्रिय झाले

सोशल मीडियावरही दोघांचे एकमेकांवरील प्रेम दिसून येते. प्रिया शंतनूबरोबरचे आपले फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करायची. त्यांच्या नात्याच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे मन जिंकले. विशेष म्हणजे प्रियाची सोशल मिडीयावरील शेवटीची पोस्ट देखील तिचा नवरा शंतनूसाठी ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीच्या उपवासात मीठ का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Viral Video : पंजाबमध्ये पूराचं भयानक वास्तव, रस्त्याची झाली नदी, जनावरांना टेरेसवर बांधलं, व्हिडीओ समोर

Jui Gadkari: जुई गडकरीचा नवा प्रवास, सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

Maval : रिंग रोड, टीपी स्कीमला मावळच्या शेतकऱ्यांचा विरोध; शेतकरी मेळाव्यात एकमताने ठराव

Maharashtra Live News Update: अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून झाली सुटका

SCROLL FOR NEXT