Priya Berde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priya Berde : प्रिया बेर्डे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

Priya Berde New Marathi Serial : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बेर्डे नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. खूप वेळानंतर प्रिया बेर्डे मालिका विश्वात पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बेर्डे मालिका विश्व गाजवायला सज्ज आहेत.

प्रिया बेर्डे स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिकेत झळकणार आहेत.

मालिकेत प्रिया बेर्डे खलनायिकेच्या रुपात पाहायला मिळणार आहेत.

मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत देखील गाजवली आहे. आता मोठ्या ब्रेकनंतर प्रिया बेर्डे पुन्हा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाल्या आहेत. त्यांची स्टार प्रवाह वाहिनीवरील एक कार्यक्रमात धमाकेदार एन्ट्री झाली आहे. प्रिया बेर्डे पहिल्यांदाच एक नवीन रुपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच अक्षय केळकरची 'काजळमाया' ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रिया बेर्डे एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'काजळमाया' मधील प्रिया बेर्डे यांच्या भूमिकेचे नाव 'कनकदत्ता' असे आहे. ती चेटकीण वंशामधील आहे. ती तंत्र विद्या जाणते. कनकदत्ता ही पर्णिकाची आईची भूमिकेत दिसणार आहे. यात ती आपल्या स्वार्थी मुलीला पाठिंबा देताना पाहायला मिळणार आहे. पर्णिकाची एकच इच्छा आहे की, तिचा वंश पुढे वाढवावा. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

'काजळमाया' तारीख अन् वेळ

अक्षय केळकरची 'काजळमाया' मालिका 27 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. मालिकेत मराठमोळा अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar ) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अक्षय केळकर हा 'बिग बॉस 4' चा विजेता (Bigg Boss Marathi Season 4 Winner) राहिला आहे. अक्षयसोबत रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

प्रिया बेर्डे

प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांच्या जोडाचे कायम कौतुक केले जाते. 'अशी ही बनवाबनवी', 'गृहलक्ष्मी', 'एक होता विदूषक', 'धरलं तर चावतंय', 'जत्रा' असे अनेक चित्रपट केले आहेत. चाहते आता 'काजळमाया' मालिका पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी होणार मतदान

UPI New Feature VPA: पैसे ट्रान्सफर होतील झटपट; अकाउंट नंबर नसला तरी पाठवता येणार पैसे

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT