Gautami Patil : कातिल अदा अन् ग्लॅमरचा तडका; मार्केटमध्ये गौतमी पाटीलचं नवीन गाणं आलंय, पाहा VIDEO

Gautami Patil New Song : नृत्यांगना गौतमी पाटीलचे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात तिच्यासोबत ललित प्रभाकर झळकला आहे. ललित आणि गौतमी ही जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
Gautami Patil New Song
Gautami Patil SAAM TV
Published On
Summary

ललित प्रभाकरचा 'प्रेमाची गोष्ट 2' चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'प्रेमाची गोष्ट 2' चित्रपटातील 'दिसला गं बाई दिसला 2.0' हे गाणे रिलीज झाले आहे.

'दिसला गं बाई दिसला 2.0' गाण्यात ललित प्रभाकर आणि गौतमी पाटील एकत्र पाहायला मिळत आहेत.

'आरपार'नंतर ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) 'प्रेमाची गोष्ट 2' मधून (Premachi Goshta 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. नुकतेच चित्रपटातील तिसरे गाणे 'दिसला गं बाई दिसला 2.0' रिलीज झाले असून ते सध्या प्रचंड गाजत आहे. आधीच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पहिल्या दोन गाण्यांनंतर हे गाणेही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळत आहे. 'दिसला गं बाई दिसला 2.0' या गाण्याने जुन्या आठवणींना नवा उजाळा दिला आहे. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) अफाट एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त साथीने या गाण्याला चारचाँद लागले आहेत.

'दिसला गं बाई दिसला 2.0' हे गाणे राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांच्या जोशपूर्ण संगीतासह जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांचे बोल गाण्याला लाभले आहेत. राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या आवाजात हे गाणे रंगतदार झाले आहे. गाण्याचे नृत्य दिग्दर्शन पॉल मार्शल याने केले आहे. गाण्याचे पूर्वीचे बोल आणि नव्या बीट्सचा सुंदर संगम यात पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या स्फूर्तीदायक सादरीकरणामुळे हे गाणे तरुणाईचे फेव्हरेट ठरत आहे.

रिलीज डेट?

'प्रेमाची गोष्ट 2' दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास 21 ऑक्टोबरला चित्रपटगृहात उलगडणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

'प्रेमाची गोष्ट 2'मधील रोमँटिक गाणं 'ओल्या साजं वेळी'ला (Olya Sanjveli 2.0) प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाण्यात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्यचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. रुचा आणि ललितच्या मनमोहक केमिस्ट्री जादू प्रेक्षकांना वेड लावणार आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Gautami Patil New Song
Bigg Boss 19 : "नेक्स्ट टाइम कपड़े पहनकर..."; मालती चाहरचं नेहलबद्दल आक्षेपार्ह विधान, सलमान खान कोणती शिक्षा देणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com