Priyanka Chopra Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Net Worth: खासगी विमान, 2.5 कोटींची कार, 238 कोटींचे घर; देसी गर्ल प्रियांका चोप्रा कोट्यवधींच्या संपत्तीची आहे मालक...

Latest Entertainment News in Marathi: खासगी विमान, 2.5 कोटींची कार, 238 कोटींचे घर; देसी गर्ल प्रियांका चोप्रा कोट्यवधींच्या संपत्तीची आहे मालक...

साम टिव्ही ब्युरो

Priyanka Chopra Net Worth: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याचा प्रसार करणाऱ्या प्रियांका चोप्राचा आज 41 वा वाढदिवस आहे. 2000 साली मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी प्रियांका निक जोनससोबत लग्न केल्यानंतर आता अमेरिकेत वास्तव्यास आहे. प्रियांका चोप्रा आज जगभरात जगभरात प्रसिद्धी असण्यासोबतच कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

अभिनेत्री असण्यासोबतच ती एक यशस्वी बिझनेस वुमन देखील आहे. तिचा अनोमली नावाचा हेअरकेअर ब्रँड, परफेक्ट मोमेंट नावाचा कपड्यांचा ब्रँड आणि न्यूयॉर्कमध्ये सोना नावाचे रेस्टॉरंट आहे. प्रियांकाचे पर्पल पेबल पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाऊसही आहे. (Latest Entertainment News)

प्रियांका चोप्राने 2002 साली 'थमिजान' या तमिळ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. प्रियांकाने 2003 मध्ये सनी देओलसोबत 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर ती आता अमेरिकेत राहते आणि अनेक हॉलीवूड प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. (Latest Marathi News)

एका चित्रपटासाठी घेते 12 कोटी

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. टाईम मॅगझिनने तिचा जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला आहे. एका बॉलीवूड चित्रपटासाठी 12 कोटी, तर हॉलिवूड वेब सीरिजच्या एका भागासाठी 2 कोटी रुपये आकारते. ती तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 3 कोटी रुपये घेते. याशिवाय एका जाहिरातीसाठी तिला 5 कोटी रुपये फी देखील मिळते.

एकूण संपत्ती 620 कोटी

प्रियांका चोप्राने चित्रपट, जाहिराती आणि इतर कार्यक्रमांतून भरपूर कमाई केली आहे. प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती 620 कोटी रुपये आहे. ती दर महिन्याला 1.5 कोटी रुपये कमावते. प्रियांकाचे अमेरिकेत 238 कोटींचे घर आहे. याशिवाय तिच्याकडे मुंबईत दोन आलिशान घरे आहेत ज्यांची किंमत 8-8 कोटी रुपये आहे. गोव्यातील बागा बीचजवळही तिची मालमत्ता आहे. ज्याची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT