Kiran Mane New Project: लवकरच येत्या काही दिवसांमध्ये कलर्स मराठी वाहिनीवर स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ मालिका येणार आहे. ‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेची घोषणा झाल्यापासून मालिकेची चर्चा टेलिव्हिजनसृष्टीसह सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू झाली आहे. नुकतंच या मालिकेविषयी मराठी टेलिव्हिजन अभिनेता किरण मानेने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट केल्यानंतर सध्या सोशल मीडियावर तो कोणती भूमिका साकारणार अद्याप हे तरी गुलदस्त्यातच आहे.
‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ या नव्या मालिकेत किरण माने कोणते पात्र स्विकारणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी, नव्या प्रोजेक्टविषयी सुचक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये किरण माने म्हणतो, “प्रेक्षकहो, तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीच तोडणार नाही. आता माझी ही जी कलाकृती येतेय... ती तुमचे मनोरंजन तर करेलच, पण तुमचं आयुष्य समृद्ध करणारं खूप मोलाचं काहीतरी देण्याची ताकदही यात असणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो.”
किरण माने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “ ‘मालिका उथळ असतात’, ‘सासु-सून, नणंद-भावजया यांच्यातला कलह किंवा विवाहबाह्य संबंध यापलीकडे मालिकांना विषय नसतात.’ अशा तक्रारी आपण कायम ऐकत आलो आहोत. त्यात तथ्यही आहे. पण आता या सगळ्या चौकटी मोडून-तोडून प्रेक्षकांना एक अस्सल, आशयघन, प्रभावी आणि काळजाला स्पर्श करणारं काहीतरी देण्याचा प्रयत्न 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून केला आहे.”
किरण माने आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणतो, “या सिरीयलमध्ये टीआरपीच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे भरले जाणार नाहीत. या सिरीयलमध्ये कथानकात पाणी घालून ते पसरट केले जाणार नाही. या सिरीयलच्या चित्रीकरणापासून दिग्दर्शनापर्यंत आणि लेखनापासून अभिनयापर्यंत सगळ्या गोष्टी, तुम्हाला एखादा दर्जेदार सिनेमा पहात असल्यासारखा आनंद देतील !”
“तुम्ही, विशेषत: ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी मला लावलेला अतोनात जीव, हे माझं बळ आहे. एक अभिनेता म्हणून मला तुमचं प्रचंड प्रेम लाभलंय. चाहत्यांचं हे प्रेम सार्थ ठरावं यासाठी, या जगावेगळ्या मालिकेतली एक अफलातून भुमिका मी समरसून, तनमन अर्पून साकारण्याचा प्रयत्न करतोय... ‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ ही नवी मालिका १५ ऑगस्टपासून सं. ७ वा. आवर्जुन कलर्स मराठीवर पाहता येईल.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.