Pravin Tarde- Deool Band 3 saam tv
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde- Deool Band 3 : राघव शास्त्रीला स्वामींचा अमेरिकेत फोन; 'देऊळ बंद ३' येणार, गश्मीर महाजनीची दमदार एन्ट्री | VIDEO

Deool Band 3 Announcement : 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशात सोशल मीडियावर 'देऊळ बंद ३' ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद ३'मधून पुन्हा गश्मीर महाजनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' गुरुवारी रिलीज झाला.

'देऊळ बंद ३' मधून गश्मीर महाजनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'देऊळ बंद ३' चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असलेला 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला (गुरुवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन दिवसांत चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे आणि आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश देणे हा आहे.

'देऊळ बंद २' चा पहिला भाग 'देऊळ बंद' २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'देऊळ बंद' मध्ये मराठी अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. अशात आता 'देऊळ बंद २'च्या शेवटी गश्मीर महाजनी म्हणजेच राघव शास्त्रीची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे 'देऊळ बंद ३' येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, राघव शास्त्री अमेरिकेत आपल्या कंपनीत असताना त्याला स्वामींचा फोन येतो. स्वामी त्याला म्हणतात, "मी अक्कलकोटहून स्वामी समर्थ बोलतोय, तुला मी आठवतोय का? India@11 " हे ऐकताच राघव शास्त्रीला मोठा धक्का बसतो. गश्मीर म्हणतो, "ओह माय गॉड" त्यावर स्वामी म्हणतात, "येस माय डार्लिंग, आय एम युअर गॉडच... काय म्हणतेय तुझी अमेरिका? काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प?" त्यावर राघव म्हणतो, "आज 10 वर्षांनी माझी कशी काय आठवण झाली?" त्यावर स्वामी म्हणतात, "तुझ्या सारख्या एका नास्तिकाला मार्गी लावून आलोय. तुझ्या मनातील नास्तिकता कमी नाही झाली?" त्यावर राघव शास्त्री म्हणतो, "तुम्हाला माझ्या मनात किती अस्तिकता आहे हे पाहण्यासाठी अमेरिकेत यावंच लागेल महाराज..." हे बोलताच स्क्रीनवर 'देऊळ बंद ३' ची घोषणा होते. लिहिलेले दिसते की, 'देऊळ बंद ३-आत्मनिर्भर भारत'

'देऊळ बंद ३' च्या घोषणेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. आता राघव शास्त्री आणि स्वामींना एकत्र पाहायला चाहते उत्सुक आहेत. तसेच स्वामी आता थेट अमेरिकेतून प्रेक्षकांशी, भक्तांशी संवाद साधणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

SCROLL FOR NEXT