Deool Band 2 Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 23 : प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' आता लवकरच १०० कोटींच्या टप्पा पार करणार आहे. चित्रपटाने चौथ्या शुक्रवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज

'देऊळ बंद २' सिनेमा १०० कोटी पार करणार

बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा डंका

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचा चौथ्या आठवडा सुरू आहे. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. 'देऊळ बंद २' सिनेमा २१ मे ला रिलीज झाला असून लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'देऊळ बंद २' ची टीम अनेक थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना सरप्राइज देत आहे. चित्रपटातून स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २३

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २' चित्रपटाने २३ व्या दिवशी म्हणजेच चौथ्या शुक्रवारी १.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ७६.३९ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ६५.०२ कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट आता वीकेंडला किती कोटींचा गल्ला जमावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १३ - २.३५ कोटी रुपये

  • दिवस १४ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १५ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १६ -१.४० कोटी रुपये

  • दिवस १७ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १८ - ३.१५ कोटी रुपये

  • दिवस १९ - १. १५ कोटी रुपये

  • दिवस २० - १.१० कोटी रुपये

  • दिवस २१ - ९० लाख रुपये

  • दिवस २२ - ८५ लाख रुपये

  • दिवस २३ - १.२७ कोटी रुपये

  • एकूण - ६५.२ कोटी रुपये

'देऊळ बंद २' स्टारकास्ट

'देऊळ बंद २' चित्रपट स्वामींची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी साकारली आहे. त्यासोबतच चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे , महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'सध्यातरी अर्थ खातं माझ्याकडे'; मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा 'अर्थ' काय?

'या' ५ चुकांमुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते

EV Charging : पेट्रोलपेक्षा स्वस्त पडेल इलेक्ट्रिक गाडी, दर महिन्याला किती येतो मेंटेनेंसचा खर्च?

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून ४० विद्यार्थ्यांना कोट्यवधींचा गंडा; पालकांची फसवणूक करणारा महाठग गजाआड

SCROLL FOR NEXT