Prathana Behere Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prathana Behere: '...म्हणून आम्ही अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला'; प्रार्थना बेहरेने सांगितलं मुंबईपासून दूर राहण्याचे कारण

Prathana Behere Interview: मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. प्रार्थनाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. प्रार्थना काही दिवसांपूर्वी अलिबागला शिफ्ट झाली आहे. अलिबागला शिफ्ट होण्याचं कारण आता प्रार्थनाने सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. प्रार्थनाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. प्रार्थना अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्रार्थना काही दिवसांपूर्वी अलिबागला शिफ्ट झाली आहे. अलिबागला शिफ्ट होण्याचं कारण आता प्रार्थनाने सांगितले आहे.

प्रार्थना बेहरे नवरा अभिषेक आणि सासरच्यांसोबत अलिबागला शिफ्ट झाली आहे. प्रार्थनाने नुकतीच सुरेखा तळवळकर यांच्या 'दिल के करीब' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने अलिबागला शिफ्ट होण्यामागचं कारण सांगितलं आहे. प्रार्थना म्हणाली, 'माझ्या नवऱ्याच्या आजोबांची जागा अलिबागला होती. कोविडच्या काळात आम्ही ती जागा डेव्हलप करण्याचे ठरवले. तिथे आम्ही घोडे, कुत्रे असे प्राणी पाळले आहेत. त्यानंतर रो- रो बोट सुरु झाली. नवरा अभिला नेहमी तिथे जायला लागायचं. परंतु माझी मालिका सुरु असल्याने मला इथेच जुहूला राहावं लागलं. त्यामुळे मग मालिका संपल्यानंतर आम्ही अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. मुंबईत तशी मज्जा नाही.

सततची वाहतूक कोंडी, धावपळीचे जीवन त्यामुळे स्वतः ला वेळ देता यायचा नाही. त्यामुळेच आम्ही कायमचा अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. माझे सासू- सासरेदेखील अलिबागला शिफ्ट होण्यासाठी तयार झाले. त्या वातावरणात त्यांचंही आयुष्य वाढलंय असं मला वाटते. तिथे मी झाडांची काळजी घेते. माझी पेटिंग करण्याची आवड जपते. प्रवासासाठी थोडा त्रास व्हायचा मात्र आता सवय झाली आहे'.

या कार्यक्रमात प्रार्थनाने मूल न होऊन देण्याच्या विषयावर भाष्य केलं आहे. मला पहिल्यापासूनच मूल नको होतं. त्याऐवजी मला पाळीव प्राणी खूप आवडतात. माझं लग्न ठरलं तेव्हा अभीचीदेखील हीच इच्छा असल्याचे मला समजलं. त्यानंतर आम्ही मूल न होऊन देण्याचा निर्णय घेतला. आमच्या कुटुंबाचाही आम्हाला पाठिंबा आहे.

Edited By-Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT