मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतीय मीडिया इंडस्ट्रीतील सर्वात मोठे नाव होणार आहे. मुकेश अंबानी एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. करार झाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या ताब्यात 100 हून अधिक चॅनल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असतील. तज्ज्ञांच्या मते, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्नेचे विलीनीकरण जवळपास निश्चित मानलं जात आहे. दोन्ही कंपन्यांमधील चर्चा प्रगत पातळीवर पोहोचली आहे. (latest scheme news)
Star India आणि Viacom18 च्या विलीनीकरणामध्ये 100 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. जर हे विलीनीकरण झालं, तर ते मीडिया उद्योगातील आतापर्यंतचं सर्वात मोठं विलीनीकरण ठरणार आहे. ( 'साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोणाचा वाटा किती असेल
Star-Viacom18 विलीनीकरण युनिटमध्ये रिलायन्सचा हिस्सा 51 टक्क्यांपेक्षाही जास्त असू शकतो. तर, डिस्नेचा वाटा 40 टक्के असेल. उदय शंकर आणि जेम्स मर्डोक यांच्या बोधी ट्री सिस्टीम्सचा विलीनीकरण युनिटमधील हिस्सा 7-9 टक्के असू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स विलीनीकरण युनिटमध्ये अतिरिक्त भांडवल गुंतवू शकतं, जेणेकरून ही नवीन कंपनी थेट सहायक कंपनी म्हणून तयार करता (Mukesh Ambani Biggest Deal) येईल. Star आणि Viacom18 ने 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षात 25,000 कोटी रुपयांची एकत्रित कमाई केली होती.
टीव्ही आणि डिजिटल व्यतिरिक्त, संयुक्त युनिटकडे इंडियन सुपर लीग आणि प्रो कबड्डी लीगचे हक्क देखील असतील. या प्रकरणाशी संबंधित एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं की, क्रिकेट हक्कांपासून होणारे नुकसान आणि डिस्ने आणि हॉटस्टारच्या ग्राहकसंख्येतील घसरणीशी जुळवून घेत, रिलायन्सने स्टार इंडियाचे मूल्यांकन $4 अब्ज केलंय. त्यामुळे युक्त युनिटचं मूल्यांकन $8 अब्ज झालं आहे.
रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ
शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही वाढ दिसून (Mukesh Ambani Take Over Channels) आली. ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या समभागांनी 3 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली होती. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स 2.18 टक्क्यांनी म्हणजेच 62.05 रुपयांच्या वाढीसह 2914.75 रुपयांवर बंद झाले होते.
कंपनीचे शेअर्स 2,949.90 रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी कंपनीचे शेअर्स 3000 रुपयांची पातळी ओलांडू शकतात. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते. त्यामध्ये फक्त 28 हजार कोटी रुपयांचा फरक राहिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.