कमी पैशात जास्त परतावा मिळावा यासाठी अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, कोणत्या वेळी कोणते शेअर्स खरेदी करायचे याबाबत काहींना माहिती नसते. परिणामी अनेकजण हातातील पैसे गमावून बसतात. आज आम्ही तुम्हाला अशा शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याने वर्षभरातच गुंतवणूकदारांना लखपती बनवलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेअर बाजारात (Share Market) असे अनेक शेअर्स आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. असाच बंपर नफा देणारा एक शेअर्स ऑरियनप्रो सोल्युशन्सचा आहे. सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीच्या या शेअर्सने वर्षभरातच गुंतवणुकदारांना मोठा परतावा दिला आहे.
गेल्या ९ महिन्यात या शेअर्सने गुंतवणुकदारांना ६८३ टक्के परतावा दिला आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये १० हजारांची गुंतवणूक केली असेल, त्याची गुंतवणूक आज तब्बल ५.५ लाख रुपयांमध्ये बदलली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काळात शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ओरियनप्रो सोल्यूशन्सचा शेअर्स तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ७ मे २०२० रोजी सुमारे ४० रुपयांवर व्यवहार करत होता. आज याच शेअर्सची किंमत २,२४८ रुपये इतकी झाली आहे. जर आपण गेल्या एका वर्षाबद्दल बोललो तर, २८ मार्च २०२३ रोजी हा शेअर्स २९१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, गेल्या ९ महिन्यांत तो झपाट्याने वर गेला.
शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार होते. विविध कंपन्यांचे पेनी स्टॉक जसे झपाट्याने वर जातात तसे खाली सुद्धा येतात. कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, आपण एकदा शेअर बाजारातील तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. असे न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. साम टीव्ही कुठल्याही शेअर्सची हमी घेत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.